Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) मधून रशियाला बेदखल करण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) मतदान झाले. रशियाविरोधातील या ठरावावर भारताने मतदानात भाग घेतला नाही. यावेळी झालेली मतदानात प्रस्तावाच्या बाजूने 93 तर विरोधात 24 मते पडली. भारतासह 58 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. मतदानानंतर रशियाला UNHRC मधून निलंबित करण्यात आले आहे. युक्रेनमधील बुका येथे झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.


युक्रेनच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपत्कालीन सत्रात मतदान करण्यापूर्वी सांगितले की, "आम्ही आता एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करत आहोत, ज्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा (UNHRC) एक सदस्य दुसर्‍या देशाच्या भूभागावर भयंकर मानवाधिकार उल्लंघन आणि गैरवर्तन करतो. जे युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याच्या बरोबरीचे आहे.'' युक्रेनचे प्रतिनिधी म्हणाले आहेत की, रशियन संघाचे निलंबन करणे हा एक पर्याय नसून हे एक कर्तव्य आहे.''   


दरम्यान, युक्रेनच्या विविध भागांतून विशेषत: बुका येथून समोर आलेल्या वेदनादायक फोटोनी जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाविरुद्ध खटला चालवण्याची आणि कठोर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वात शक्तिशाली युनिटला मृतदेहांच्या ढिगाऱ्याचे संक्षिप्त व्हिडिओ फुटेज दाखवून "रशियन आक्रमण थांबवा" असे आवाहन केले होते. त्यानंतर आज रशियाचे युक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबन करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Pakistan Political Crisis: इम्रान खान यांना 9 एप्रिलला अविश्वास प्रस्तावाचा करावा लागेल सामना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेला मदत करण्यासाठी 'मोठा भाऊ' भारताचे आभार : सनथ जयसूर्या


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha