Russia Ukraine War : व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, 'रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही. आमचे लक्ष विश्व युद्ध कसे रोखायचे यावर आहे.' जेन साकी पुढे म्हणाल्य की, 'युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांचा असा विश्वास आहे की, तेल कंपन्यांकडे युनायटेड स्टेट्समध्ये अधिक तेल आयात करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि क्षमता आहे. तेल आयातीबद्दल व्हेनेझुएलाशी कोणतीही चर्चा झालेली नाही.'


अमेरिकेकडून युक्रेनला आर्थिक मदत
अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नसली तरी, युक्रेनला आर्थिक मदत करत आहे. अमेरिकेचा 1.5 ट्रिलियन डॉलर बजेटमध्ये युक्रेनची मदत रक्कम 14 अब्जांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. युक्रेनला मदत करण्यासाठी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन सदस्य एकत्र आले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.


राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनची मदत 10 अब्ज डॉलर्स वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनसाठी लष्करी, मानवतावादी आणि आर्थिक मदतीचे पॅकेज 12 अब्ज डॉलर्सवरून 14 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्यात आले आहे. 'आम्ही युक्रेनला दडपशाही, हिंसाचाराच्या विरोधात पाठिंबा देणार आहोत', असे बायडेन व्हाईट हाऊसमध्ये म्हणाले.


युक्रेनला मदत दोन्ही पक्षांनी मान्य केली आहे आणि हे युद्धग्रस्त देशाला मदत करण्यासाठी काँग्रेसची (यूएस संसद) इच्छा दर्शवते, परंतु असे अनेक सदस्यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. दरम्यान, रिपब्लिकन सदस्यांनी बायडेन यांच्यावर युक्रेन आणि नाटो देशांना मदत करण्यात आणि रशिया आणि त्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर निर्बंध लादण्यात मागे असल्याचा आरोप केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha