Viral Video : आजकाल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) व्हायला (Viral Video) वेळ लागत नाही. युजर्स नेहमीच अशा व्हिडिओंच्या शोधात असतात, ज्यामध्ये खूप मनोरंजन असते. आई आणि मूल यांच्यातील सर्वात अनोख्या नातेसंबंधाची उदाहरणे आपण सर्वांनी पाहिली आहेत. आई-वडिलांच्या नात्याचा अनोखा संगम माणसांबरोबरच प्राण्यांमध्येही पाहायला मिळतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळतं की, ती व्यक्ती मोराला हटवून अंडी चोरण्याचा प्रयत्न करते, त्याचवेळी मोर हवेत उडत येऊन त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर सगळेच हैराण झाले आहेत.
आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो युजर्सनी पाहिला असून याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच यूजर्स व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही युजर्सनी मोराचे वर्णन खूप धाडसी असे केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : हँडलवर उभं राहून चालवली सायकल; तोल सांभाळताना पाहून व्हाल थक्क, डोळ्यावर विश्वास बसणार नाही
- Russia Ukraine War : रस्त्यावर मृतदेह, अन्नाच्या शोधात भटकणारे लोक; रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंसाचं दृश्य
- Russia Ukraine War : देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाचं प्रपोज, चेकपॉईंटवरच घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha