Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज 15वा दिवस आहे. रशियाने युक्रेनरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. आता अमेरिकेने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ला (Chemical Attack) करण्याच्या तयारीत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की रशिया युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रास्त्र हल्ल्याची योजना आखत आहे त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. प्रेस सेक्रेटरी जेन साकी म्हणाले की, अमेरिकेच्या जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रयोगशाळा आणि युक्रेनमधील रासायनिक अस्त्रांच्या विकासाबाबत रशियाचे दावे चूकीचे आहेत. हे खोटे दावे पुढील पूर्वनियोजित आणि प्रक्षोभित हल्ल्यांचे समर्थन करण्यासाठी रशियाची स्पष्ट चाल आहे. जेन साकी यांनी सांगितले की, अमेरिकेने युक्रेनमध्ये संभाव्य रशियन रासायनिक हल्ल्याचा इशारा दिला आहे.


अमेरिकेच्या खासदारांनी युक्रेनची मदत करण्याचे केले मान्य
युक्रेन आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी 13.6 अब्ज डॉलर निधी देण्याच्या द्विपक्षीय ठरावाच्या मसुद्याला बुधवारी यूएस काँग्रेसच्या सदस्यांनी सहमती दिली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या 15 ट्रिलियन डॉलरच्या उर्वरित बजेटचा भाग म्हणून फेडरल एजन्सींना कोट्यवधी डॉलर्सची अतिरिक्त मदत देण्यासही खासदारांनी सहमती दर्शविली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनला लष्करी, मानवतावादी आणि आर्थिक मदत देण्यासाठी 10 अब्ज डॉलरच्या बजेटची विनंती केली. दरम्यान, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने ही रक्कम 13.6 अब्ज डॉलर इतकी झाली. 


ब्रिटन युक्रेनला पाठवणार आणखी शस्त्रे
दरम्यान, ब्रिटनने बुधवारी सांगितले की, पूर्वेकडील युक्रेनला रशियाच्या हल्ल्यांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी ब्रिटन युक्रेनला अधिक शस्त्रे, तसेच विशेष रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे पाठवणार आहे. संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी ब्रिटन संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले की, ब्रिटन आधीच पाठवलेल्या 2,000 हलक्या टाकी क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त आणखी 1,615 क्षेपणास्त्रे पाठवेल. यामध्ये लांब पल्ल्याची भाला क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची एक तुकडीचा देखील समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha