ISIS : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने गुरुवारी पहिल्यांदाच त्यांचा प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशमी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयसीसने गुरुवारी प्रथमच मान्य केले की, गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांचा प्रमुख नेता मारला गेला होता. ISIS नेता अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशीबद्दल पहिल्यांदा अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. त्यानंतर आता ISISने आपला नवा म्होरक्या निवडला आहे.


अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, तुर्कीच्या सीमेजवळील उत्तर-पश्चिम सीरियातील अटमेह शहरात अमेरिकेने 3 फेब्रुवारी रोजी अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशीच्या लपण्याच्या जागेवर हल्ला केला होता, तेव्हा कुरैशीने कुटुंबातील सदस्यांसह स्वत: ला बॉम्बने उडवले.


ISISचे प्रवक्ते अबू ओमर अल-मुहाजेर यांनी गुरुवारी जारी केलेल्या एका ऑडिओ संदेशात ISISचा नेता तसेच या गटाचा माजी प्रवक्ता अबू हमजा अल-कुरैशी यांच्या अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुहाजेर म्हणाले की, ISISने अबू अल-हसन अल-हाशमी अल-कुरैशी याची नवीन नेता म्हणून निवड केली आहे.


अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशी 2019 मध्ये ISIS चा प्रमुख बनला होता. ISIS च्या जगात हे एक नवीन नाव होते, त्यामुळे जगाला त्याची कमी माहिती होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'ISISचा नवा प्रमुखे आला आहे आणि तो कोण आहे हे आम्हाला माहीत आहे.'


यानंतर अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरेशी गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेला. मात्र, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून याबाबत कोणतेही दुजोरा मिळाला नाही. 


रिपोर्ट्सनुसार, अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशीचे बालपणीचे नाव अमीर मोहम्मद अब्दुल रहमान अल मावली अल सल्बी होते, त्यांचा जन्म 1976 मध्ये झाला होता. पण, ISIS मध्ये सामील झाल्यानंतर त्याने आपले नाव बदलले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha