Russia Ukriane Conflict in UNSC : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभराची चिंता वाढली आहे.  रशियानं आक्रमक पवित्रा घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहेत. या प्रांतांनाच स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देणाऱ्या करारावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढंच नव्हे तर आता रशियानं या दोन्ही प्रांतात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) तातडीची बैठक बोलावली.  या बैठकीत रशियाने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. 


संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिली. अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा निषेध केला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी घेतलेला निर्णय हा युक्रेनचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले. 


भारताची भूमिका काय?


या बैठकीत भारतानेही आपली भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले की, युक्रेनच्या सीमेवर वाढणारा तणाव हा गंभीर विषय आहे. सध्या घडत असलेल्या घटनांमुळे या भागातील शांतता आणि सुरक्षितेला कमकुवत करू शकतात. वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. युक्रेनमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, डॉक्टर युक्रेनच्या विविध भागात वास्तव्यास आहेत. या भारतीयांची सुरक्षिता ही आमची प्राथमिकता असल्याचेही टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले. 





रशियाच्या पावित्र्याने खळबळ 


रशियन जनतेला संबोधित करताना राष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासही नकार दिला. रशियाच्या या पवित्र्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. फ्रान्स, अमेरिका, जर्मनी रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha