Russia-Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनवरील हल्ला म्हणजे हिटलरशाही असून रशियाचं हे वर्तन 'नाझी जर्मनी'सारखं असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांनी केला आहे. रशियासोबतचे युक्रेनचे सर्व राजनयिक संबंध समाप्त करत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून त्यामुळे या भागात तणावाची परिस्थिती आहे. 


रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला म्हणजे 'नाझी जर्मनी'सारखं वर्तन आहे असं राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांनी म्हटलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी रशियासोबतचे सर्व राजनयिक संबंध तोडत असल्याची घोषणाही केली. 


 






या आधी रशिया आणि युक्रेनमध्ये 2004 साली आणि 2014 साली तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 2014 साली तर रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनचा क्रिमिया हा भाग बळकावला होता. त्यानंतरही युक्रेनने रशियाशी आपले राजनयिक संबंध कायम ठेवले होते. पण आता रशियाने पुन्हा हल्ला केल्यानंतर हे संबंध तोडण्याचा निर्णय युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला आहे. 


 







युक्रेनचे भारताला मदतीसाठी आवाहन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटलं आहे. भारताने या प्रश्नावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ संवाद साधायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितलं आहे की, रशियाने युक्रेनची राजधानी कीवजवळ हल्ले केले आहेत. त्यामुळे  आम्ही भारताला मदतीचे आवाहन करतो. जगभरातील हा तणाव कमी करण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल.


संबंधित बातम्या: