Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये (Ukraine-Russia) रशियाचा हल्ला सातत्याने सुरू असून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी जगभरातील मोठ्या देशांना सातत्याने विनंती करत आहे. आता युक्रेनच्या (Ukraine) वतीने भारताच्या पंतप्रधानांना (PM Narendra Modi) मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनच्या भारतातील राजदूताने याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.


पीएम मोदींना मदतीचे आवाहन


युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना आवाहन करत त्यांनी याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ बोलायला हवे. युक्रेनच्या राजदूताने सांगितले की, राजधानी कीवजवळही हल्ले झाले आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. यावेळी मोदीजी खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना मदतीचे आवाहन करतो. जगातील तणाव केवळ भारतच कमी करू शकतो. त्यांनी सांगितले की, 5 रशियन विमाने पाडण्यात आली आहेत.


भारताची भूमिका काय आहे?


युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान मोदींना मदतीची विनंती केली असली तरी या संपूर्ण प्रकरणावर भारताची तटस्थ भूमिका आहे. भारत कोणत्याही बाजूने बोलला नाही. तसेच या घडामोडीबाबत पीएम मोदींनी अद्याप ट्विट केलेले नाही. त्याचबरोबर युक्रेनच्या मुद्द्यावर सध्या आम्ही तटस्थ आहोत, असे परराष्ट्र राज्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha