Russia-Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले  आहेत. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतीय नागरिकांसाठी  युक्रेनमधील दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना  जारी करण्यात आल्या आहेत.  या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय नागरिक युक्रेनच्या पश्चिमेकडे स्थलांतर करु शकतात. मात्र, आपल्यासोबत आपले पासपोर्ट आणि गरजेची कागदपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेच. त्यासोबत दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आले आहे. या अगोदर भारतीय नागरिकांना आणण्यासाठी गेलेले विमान माघारी आले. 


मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की,  युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. अडचणीत असलेले नागरिकांना मदतीसाठी दुतावासाच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. या शिवाय दूतावासाने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. मदतीसाठी नागरिकांना  +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 


युक्रेनमध्ये  रशियाचा हल्ला सातत्याने सुरू असून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी जगभरातील मोठ्या देशांना सातत्याने विनंती करत आहे. आता युक्रेनच्या  वतीने भारताच्या पंतप्रधानांना  मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनच्या भारतातील राजदूताने याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली.


भारताची भूमिका काय आहे?


युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान मोदींना मदतीची विनंती केली असली तरी या संपूर्ण प्रकरणावर भारताची तटस्थ भूमिका आहे. भारत कोणत्याही बाजूने बोलला नाही. तसेच या घडामोडीबाबत पीएम मोदींनी अद्याप ट्विट केलेले नाही. त्याचबरोबर युक्रेनच्या मुद्द्यावर सध्या आम्ही तटस्थ आहोत, असे परराष्ट्र राज्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :