एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं
![काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं Rocket Lands Inside Indian Ambassadors House In Kabul काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06152803/Kabul_Embassy_Attack.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय राजदूत मनप्रीत वोहरा यांच्या घरात रॉकेट कोसळलं. मनप्रीत वोहरा यांच्या घराच्या टेनिस कोर्टमध्ये रॉकेट कोसळलं.
आज सकाळी 11.15 वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, कोणत्याही भारतीयाला दुखापत झालेली नाही.
हा अपघात होता की घातपात?, जर घातपात असेल तर कोणी घडवला हे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काबूल शहर हायअलर्टवर असताना ही घटना घडली.
याआधी 31 मे रोजी काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू झाला होता, तर 325 पेक्षा जास्त जखमी झाले होते. त्यावेळीही भारतीय दुतावासाचे सर्व कर्मचारी सुदैवाने सुरक्षित होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)