Rishi Sunak on Transgender :  ब्रिटन (Britain) चे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी नुकतेच लिंगभेदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान (UK Prime Minister) ऋषी सुनक यांनी एका भाषणात लिंगभेदावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटलं की, पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही एक स्त्री असते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता LGBTQ समुदायाकडून कडाडून विरोध केला जात आहे.


ऋषी सुनक यांच्या लिंगभेदासंदर्भात वक्तव्याने नवा वाद


ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत त्यां भाषणात लिंगभेदावर वक्तव्य केलं. यावर त्यांनी आपलं मत मांडताना म्हटलं की, 'पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही एक स्त्री असते, हे 'सामान्य ज्ञान' आहे.'' एक वक्तव्यानंतर तृतीयपंथी (Transgender) अधिकार कार्यकर्त्यांकडून सुनक यांच्यावर टीका केली जात आहे. सनक यांच्या भाषणादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.


ऋषी सुनक काय म्हणाले?


भाषणात ऋषी सुनक यांनी म्हटलं की, "लोकांनी त्यांना पाहिजे असलेलं कोणतंही लिंग असू शकतं, यापेक्षा इतर लिंग (पुरुष आणि महिला या शिवाय इतर) असू शकतं यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला धमकावू नये. पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. हा कॉमन सेन्स आहे.'' यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत लिंगभेदाबद्दल केलेल्या वक्तव्याचं काहींनी समर्थन केलं तर, तृतीयपंथी समुदायाकडून मात्र, या वक्तव्यावर रोष व्यक्त केला आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






ऋषी सुनक यांचं सर्वोत्तम भाषण 


ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत भाषण (Rishi Sunak Conference Speech) केलं. सुनक यांचे हे भाषण 1997 नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या कोणत्याही नेत्यापैकी सर्वोत्तम भाषण असल्याचं बोललं जात आहे. भाषणादरम्यान त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही मंचावर उपस्थित होत्या.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Afghanistan Earthquake Video : अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप! 2000 जणांचा मृत्यू, शक्तिशाली भूकंपानंतरचं वास्तव दाखवणारी दृश्यं