Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आता आणखी पेटला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) आणि इस्रायल यांच्यात सध्या युद्ध (Israel-Palestine War) सुरु आहे. हमासने गाझापट्टी रिकामी करा, असा गंभीर इशार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांनी दिला आहे. हमासने गाझापट्टी रिकामी करा, नाहीतर जोरदार कारवाई करु, असा गंभीर इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी (Prime Minister of Israel) हमासला दिला आहे. ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत, ते ठिकाण संपवून टाकण्याचा गंभीर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांनी दिला आहे. 


हमासचे नागरिक असलेली ठिकाणं संपवू, पंतप्रधानांचा इशारा


हमासच्या हल्ल्यामुळे नेत्यानाहू सरकार संकटात सापडलं आहे. हमासचा हल्ला नेत्यानाहू सरकारचं अपयश असल्याची भावना इस्रायलमधील नागरिक व्यक्त करत आहेत. कारण, इस्रायलचे नागरिक इस्रायल सरकारला दोष देत आहेत. गाझापट्टीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा असताना हमासचे दहशतवादी आत शिरतात आणि नागरिकांवर हल्ला करतात, हे सरकारचं अपयश आहे. हमासने इस्रायलवर आतापर्यंत 5000 क्षेपणास्र डागली आहेत, हे सरकराचं अपयश असल्याची प्रतिक्रिया इस्रायली नागरिकांची आहे. त्यामुळे नेत्यानाहू सरकारला आपली प्रतिमा राखणं हे आव्हान आहे, असं मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली आहे.


इस्रायल-हमास संघर्षात आखाती देश उतरणार?


इस्रायल हमासवर जोरदार प्रतिहल्ले करत आहे. पण, गाझापट्टीमध्ये हल्ला केल्यास तिथे पॅलेस्टिनी नागरिक आहेत. गाझामध्ये हल्ल्यात आणखी रहिवासी नागरिकांचा मृत्यू झाल्यास तर अरब देश पुन्हा एकत्र येणं कठीण आहे. कारण, या हल्ल्यामध्ये पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्यास, या युद्धात अरब देशही उतरतील, असे झाल्यास इस्रायलची बाजू अवघडल्यासारखी होणार आहे. याचा परिणास आखाती देश म्हणजे संपूर्ण पश्चिम आशियातील देशांवर होईल.


300 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक जखमी


हमासने शनिवारी, 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवरही हल्ले करण्यात येत आहे. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलमधील 300 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 1500 च्या पुढे गेली आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 232 आहे, तर 1700 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास स्थलांतर करण्यास सांगितलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel-Palestine War : इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका! मृतांची संख्या 300 वर, 1590 जखमी; हमासने इस्रायलींना ठेवलं ओलिस