Iran Israel conflict : इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला असून शुक्रवारी रात्री (13 जून 2025) उशिरा शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे  डागली.  इजरायलने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने हा हल्ला केला आहे. या हवाई कारवाईला इराणने  ऑपरेशन टरू प्रॉमिस 3 ' असे या नाव देण्यात आले आहे. अशातच, इस्रायल अन् इराणच्या (Israel Iran War)हल्ल्यांची वैशिष्ट्य काय?  सध्या अमेरिकेची भूमिका काय? इज्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का ? आणखी संघर्ष वाढला तर भारताला नुकसान सहन करावे लागू शकते का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊ (Israel Iran War)

Continues below advertisement


1) इजराइलच्या हल्ल्यांची वैशिष्ट्य काय?


इजरायलने परिपूर्ण तयारी करूनच इराणवर हल्ले केले आहे. त्यांच्याकडे इराणच्या सैन्य स्थळांची आणि अण्वस्त्र असलेल्या तळांची परिपूर्ण माहिती होती, त्यानंतरच त्यांनी हा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी इजराइलने 200 विमाने वापरली, एअर टू एअर रिफ्यूलींग ही केलं. अनेक दिवसांपूर्वीच ड्रोन इराणच्या आत नेले, सेफ हाउसमध्ये ठेवले आणि मग हल्ले चढवले. त्यामध्ये इराणचे दोन आण्विक तळ नष्ट झाली असून तिसऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. 


2) इराणची स्थिती काय?


प्रत्युत्तरात इराणने ही इजराइलवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले चढवले. बहुतांशी इजराइलने हवेतच नष्ट केले. मात्र काही निवासी भागांमध्ये पडले, त्यामुळे 78 लोकांचा मृत्यू झाला आहे.


3) सध्या अमेरिकेची भूमिका काय?


एक लक्षात ठेवले पाहिजे, इराणकडे इजराइलच्या तोडीची शस्त्रे नाही, संसाधने नाही. दुसऱ्या बाजूला इजराइलला संपूर्ण आकाश मोकळा आहे. या संघर्षाची खास बाब म्हणजे इराणने इजराइलवर डागलेल्या काही मिसाईल अमेरिकी युद्ध नौकानी निष्प्रभ केले. म्हणजेच अमेरिका इजराइलच्या बाजूने पूर्णपणे उतरला आहे. 


4) हे संघर्ष आण्विक युद्धाकडे जाऊ शकेल का?


इराणचे अण्वस्त्र अजून तयार झालेले नाही. येत्या पंधरा दिवसात इराणचे अण्वस्त्र तयार झाले असते, मात्र त्याची गोपनीय माहिती इजराइलला मिळाली. त्यामुळे इजराइलने स्वतःच्या संरक्षणासाठी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यामुळे सध्या तरी इजराइलवर अण्वस्त्रांचा वापर होईल अशी स्थिती नाही. 


5) तेल उत्पादन आणि त्यांच्या दरावर काय परिणाम होईल?


दोघांच्या या संघर्षात मध्यपूर्व आशियाचे इतर देश उतरलेले नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात युद्ध भडकेल अशी स्थितीत सध्या नाही. मात्र तेलाचे भाव भडकले आहे.  भारताकडे सध्या तरी आवश्यक प्रमाणात तेलाचा साठा असल्यामुळे लगेच आपल्यावर परिणाम होणार नाही. तसेच इजराइलने इराणच्या कुठल्याही रिफायनरीवर हल्ला केलेला नाही. फक्त इराणच्या सैन्यशक्तीवर हल्ले केले आहे, तेल उत्पादनाच्या ठिकाणांवर हल्ले केलेले नाही. मात्र, इराण तेलाचा उत्पादन जर बंद करणार असेल, तर जगाला त्याची झळ पोहचू शकेल. मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही.


इतर महत्वाच्या बातम्या