Israel vs Iran: गाझापट्टीत नरसंहार सुरुच असतानाच स्वत: अण्वस्त्रधारी असूनही इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत इस्त्रायलने आगळीक केली आहे. इस्त्रायलने 200 फायटर जेटने इराणमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम, लष्करी तळ आणि एअरबेसवर हल्ला केला. यामध्ये इराणचे लष्कर प्रमुख आणि आयआरजीसी प्रमुख मृत्यूमुखी पडले. तसेच दोन आण्विक कार्यक्रमातील शास्त्रज्ञही मारले गेले. यानंतर इराणने बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने पलटवार केला असून तेलअविवमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक इमारती आणि शहरी भागात इराणी मिसाईल पोहोचल्याने आर्थिक आणि जिवितहानीची शक्यता आहे. यानंतर इस्त्रायलने आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा मध्य पूर्वेत भडका उडाला असून कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे युद्धखोर इस्त्रायलच्या आगळीकीने मध्य पूर्वेतील हाहाकार आणखी वाढत जाणार आहे यात शंका नाही. मात्र, अण्वस्त्र कार्यक्रम हे नाव असलं, तरी नेत्यानाहू यांनी इराणी जनतेला केलेल्या आवाहनातून जुगार सुद्धा समोर येत आहे.
इस्त्रायलचा डाव इराणमध्ये यशस्वी होणार का?
इस्रायलचा हा डाव यशस्वी झाला, तर मध्यपूर्वात नवे सामरिक समीकरण तयार होईल यात शंका नाही, पण जर हा डाव फसला, तर त्याचे परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात. याचा थेट परिणाम अराजकता, गृहे युद्ध, आणि लाखो नागरिकांचे हाल. सध्या परिस्थिती अंधातरी आहे त्यामुळेपुढील दिशा केवळ काळच ठरवेल. इस्रायलने इराणवर केलेले जोरदार लष्करी हल्ले हे केवळ अण्वस्त्र धोका संपवण्यापुरते मर्यादित नसून, त्यामागे अधिक व्यापक आणि धोकादायक हेतू दडला आहे. तो म्हणजे इराणमधील सत्ताबदल घडवून आणणे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी थेट इराणी जनतेला सत्तेविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन करून, या संघर्षाच्या मूळ उद्दिष्टांची झलक दिली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या क्रांतिकारी गार्ड्स (IRGC) चे अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाले असून, इस्रायलने “अजून बरेच काही उरले आहे” असे स्पष्ट करत लढाई अजून संपलेली नाही असे दर्शवले आहे. इराणनेही तात्काळ प्रत्युत्तर देत इस्रायली सैन्य तळांवर हल्ले चढवले, आणि त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे.
सत्ताबदलाची जोखीम
इस्रायलची कल्पना आहे की या हल्ल्यांमुळे इराणमध्ये असंतोष उफाळून येईल आणि सत्ताधारी इस्लामिक शासन उलथवून टाकले जाईल. मात्र ही एक मोठी जोखीमयुक्त रणनीती आहे. इराणमध्ये सत्ता आधीपासूनच IRGC आणि इतर कट्टरपंथी संस्थांच्या हातात आहे. त्या ना निवडून आलेल्या आहेत, ना जनतेच्या दबावाला बघून डगमगतात.
पर्यायांची कमतरता
2022 मध्ये महिला स्वातंत्र्य आंदोलनाने काही काळ इराणला हादरवले होते. परंतु विरोधी गट आपसात नेतृत्वावर, भविष्यातील व्यवस्थेवर आणि धोरणांवर एकमत करू शकले नाहीत. रेझा पहलवी, माजी शाह यांचा मुलगा, काही प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळवतोय पण तो पुरेसा नाही. MEK (मुझाहिदीन-ए-खल्क) हे एक निर्वासित गट असून, त्यांनी भूतकाळात इराणविरोधी शत्रूंशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे आजही ते वादग्रस्त मानले जातात. याशिवाय लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, आणि राजेशाही समर्थक असे विविध विरोधी गट आहेत, पण त्यांच्यात एकवाक्यता नाही.
इराणचे पर्याय आणि अडचणी
- इराणसमोरील पर्यायही फारसे आकर्षक नाहीत
- हल्ले सुरू ठेवणे : यामुळे इस्रायलचे हल्ले आणखी तीव्र होतील.
- अमेरिकेशी वाटाघाटी : यामुळे जनतेमध्ये पराभवाची भावना निर्माण होईल.
- अमेरिकेवर हल्ला : अमेरिका थेट संघर्षात उतरेल, जे इराणसाठी अत्यंत धोकादायक ठरेल.
इतर महत्वाच्या बातम्या