Qatar New Law : कतारमध्ये नोकरी करणाऱ्या प्रवासी भारतीयांसाठी कतार सरकारने (Qatar Government) मोठा निर्णय घेतला आहे. कतार सरकारच्या नव्या नियमांनुसार, कतारमध्ये काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा अनिवार्य करण्यात आला आहे. कतारमधील कंपनी अथवा जिथं काम करतोय त्यांच्यामार्फथ आरोग्य विमा मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला कतारमध्ये हा नवा कायदा पारीत करण्यात आला. कतारमधील एका वरिष्ठ आधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.
सध्या विदेशी रहिवासी आणि पर्यटक सरकारी आरोग्य कार्डच्या मदतीनं मोजक्याच पैशांमध्ये कतारमधील आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारमधील हा नवीन कायदा गजटमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सहा महिन्यात लागू होईल. हा निर्णय घेण्यामागे काही विशेष कारण समोर आलेलं नाही. मात्र, कतार सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
कतारमध्ये येणाऱ्या सर्व अभ्यागतांना एक आरोग्य विमा खरेदी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जो, देशात राहिल्यानंतर सर्व आरोग्य व्यवस्था देईल. कतारने नुकतेच भारतीयांसोबतची हवाई वाहतूक सुरु केली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कतार आणि भारतातील प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करत आहेत. पण, प्रवाशांना दररोज बदलणाऱ्या नियमांबाबत सजग राहणं गरजेचं आहे.
साऊदी अरब, यूएई, ओमान आदि खाड़ी देशातून भारतात येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारने नुकतेच आपल्या विदेशी वाहतूक नियमांत बदल केले आहेत. सर्व प्रवाशांना या नव्या नियमांना मान्य करावं लागले, असे या आदेशात म्हटलेय. प्रवाशांना ऑनलाइन एयर सुविधा पोर्टलवर आपल्या प्रवासासांदर्भात काही माहिती द्यावी लागेल. तसेच कोरोना लसीकरणासंदर्भातही माहिती द्यावी लागेल.
हेही वाचा :
New Virus in Hong Kong: हाँगकाँगमध्ये नवीन संसर्ग आढळला; 7 लोकांचा मृत्यू झाला, अलर्ट जारी
Mexico Shooting: सेटवरच अभिनेत्याच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली अन् होत्याचं नव्हतं झालं!