New Virus in Hong Kong: हाँगकाँगमध्ये प्राणघातक संसर्ग आढळला आहे. या संसर्गामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या संसर्गाच्या प्रसारामुळे हाँगकाँग आरोग्याच्या नव्या संकटाशी लढत आहे. एका अहवालानुसार, हा संसर्ग गोड्या पाण्यातील माशांपासून पसरतो. हाँगकाँगच्या वेट मार्केटने या माशांपासून होणाऱ्या संसर्गाचा उद्रेक नोंदवला आहे. त्याचवेळी, समुद्री खाद्य तज्ञांनी या वेट बाजारात गोड्या पाण्यातील माशांना स्पर्श करण्यापासून खरेदीदारांना सावध केले आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 मध्ये या घातक ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस सूक्ष्मजीवांच्या संसर्गाची 79 प्रकरणे आढळल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. या संसर्गामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालाला प्रतिसाद म्हणून, सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन (CHP) ने गुरुवारी पुष्टी केली की हा संसर्ग ST283 म्हणून ओळखला गेला आहे. संसर्ग झालेल्या 32 लोकांकडून याची पुष्टी झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की दर 30 दिवसांनी सुमारे 26 प्रकरणांची नोंद होत आहे आणि आता या संसर्गाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
त्याचवेळी, चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करायला सुरुवात केली आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शाळा बंद केल्या जात आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनने सुरुवातीच्या काळात या संसर्गावर मात केली होती. आता संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत असल्याने सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू केली आहे.
जगात सर्वाधिक लसीकरण चीनमध्ये
जगात सर्वाधिक लसीकरण चीनमध्ये झालं आहे. चीनमध्ये 75 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. जवळपास 223 कोटी लोकांचं लसीकरण चीनमध्ये झालं आहे. त्यानंतर भारतात 30 टक्क्यांच्या जवळपास लसीकरण झालं आहे. काल भारतानं 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार केला. भारतानंतर अमेरिका, रशिया, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनीमध्ये सर्वाधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.