Mexico Shooting: अमेरिकेच्या मेक्सिको येथे 'रस्ट' चित्रपटाचे शूटींग सुरू होते. या चित्रपटात अमेरिका अभिनेता एलेक बाल्डविन (Alec Baldwin) मुख्य भूमिकेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. एलेक बाल्डविन यांच्या हातात असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने सेनेमॅटोग्राफरचा (Cinematographer) मृत्यू झाला आहे. तर, चित्रपटाचे दिग्दर्शक जखमी झाले आहेत. चित्रपटात प्रोप म्हणून वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून हा प्रकार घडला आहे. या घटनेची चोकशी केली जात आहे. परंतु, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.


अहवालानुसार, शूटिंग दरम्यान एलेक बाल्डविनने चित्रपटात वापरण्यात आलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. दरम्यान, बंदुकीतून सुटलेली गोळी सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स (Halyna Hutchins) यांना लागली. त्यानंतर हलिना यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दिग्दर्शक जोएल सूझा (Joel Souza) जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र, शूटींगदरम्यान नेमके काय घडले? याची पोलीस चौकशी करीत आहेत. तसेच शूटिंग दरम्यान वापरण्यात येणारी बंदूक वास्तविक गोळ्यांनी भरलेली होती किंवा त्यातून दारू सोडण्यात आली, याचाही तपास केला जात आहे. 


चित्रपटाच्या शूटींगदरम्यान याआधीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांपूर्वी कन्नड चित्रपट 'लव्ह यू राचू'च्या सेटवर एका दुर्दैवी अपघात झाला होता. या सेटवर उपस्थित असलेला स्टंटमॅनचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग तत्काळ थांबवण्यात आले. जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळी कर्नाटक मधील बिडदी या ठिकाणी चित्रपटातील एका अॅक्शन सीनचे शूटिंग सुरू होते. याप्रकरणी स्टंट स्टंट डायरेक्टर, निर्माता आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांना पोलिसांनी अटक केली होती. 


संबधित बातम्या-