जिनेव्हा: जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला खासदाराच्या संख्येने 25 टक्क्याहून जास्त जागा व्यापली आहे आणि हे ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे असं संयुक्त राष्ट्र संघटनेची सहकारी संस्था असलेल्या Inter-Parliamentary Union (IPU) च्या 'विमेन इन पार्लमेन्ट' (Women In Parliament) या अहवालात सांगण्यात आलं आहे. हे प्रमाण आतापर्यंतचं सर्वाधिक असलं तरी लिंग समानतेचा विचार करता आपण अद्याप कोसो दूर असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


जागतिक स्तरावर महिला खासदारांचे प्रमाण हे आता 25.5 इतकं झाली आहे. असं असलं तरी या वेगाने आपण लिंग समानता गाठायची ठरली तर अजून किमान 50 वर्षे तरी लागतील असंही या अहवालात सांगण्यात आलंय. Inter-Parliamentary Union (IPU) या संघटनेकडून गेल्या काही दशकातील महिलांच्या राजकारणातील प्रमाणाचा आढावा घेण्यात आला आहे. 2019 सालच्या तुलनेत 2020 साली महिलांचे राजकारणातील प्रमाण हे 0.6 टक्के इतके वाढले आहे. रवांडा, क्युबा आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी त्यांच्या संसदेत महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवल्याबद्दल IPU ने या देशांचे कौतुक केलं आहे.


विशेषत: रवांडा या देशाचे कौतुक या अहवालात करण्यात आलं आहे. रवांडा या देशात संघर्षमय परिस्थिती असतानाही या देशाने त्याच्या संसदेत 50 टक्क्याहून जास्त जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून लिंग समानता साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो जगातील इतर देशांसाठी एक रोल मॉडेल ठरतो असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या देशाचे अनुकरण करुन जगातील इतर देशांनी त्यांच्या राज्यघटनेत बदल करावा आणि लिंग समानतेला वाव द्यावा असे आवाहनही करण्यात आलं आहे.


International Womens Day 2021 | का साजरा केला जातो महिला दिन, जाणून घ्या यामागची कारणं


जर एखाद्या विशेष मुद्द्यावर कायदा करण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग असल्यास, त्या कायद्याचे परिणाम हे अधिक चांगल्या पद्धतीने समोर येतात असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.


अमेरिका अव्वल
स्त्रियांना संसदेत संधी देण्यामध्ये जगात अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेतील एकूण खासदारांपैकी 32.4 टक्के इतक्या प्रमाणात महिलांना संधी मिळाली आहे. तर चिली, कोलंबिया, इक्वॉडोर या देशांध्ये जागतिक सरासरीपेक्षा जास्त महिलांना संसदेत प्राधान्य मिळालं आहे.


सब-सहारन आफ्रिका देशांमध्ये, माली आणि नायजर या देशांनी, त्यांच्या देशात सुरक्षेचा मुद्दा असतानाही महिलांना संसदेत स्थान देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका घेतली आहेत. तर मध्य-पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिका या देशांमध्ये त्यांच्या संसदेत महिलांना सर्वात कमी प्रमाणात स्थान दिलं असून ते 17.8 टक्के इतकं आहे. पॅसफिक देशात, न्यूझिलंडचा अपवाद वगळता इतर देशात 2020 साली महिला खासदारांनी अत्यंत कमी प्रमाणात स्थान देण्यात आलं आहे.


Women's Day 2021 Gifts Idea: महिला दिनी आपल्या आई, बहिण आणि मैत्रीणीला 'ही' विशेष भेट द्या