जगभरात दरवर्षी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्वा आहे. हा दिवस महिलांचे योगदान आणि त्यांच्याप्रती सन्मान प्रगट करण्याचा दिवस आहे. आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पातळीवरही महिलांच्या कार्याचा गौरव करण्याची ही उत्तम संधी आहे. या निमित्ताने आपण या स्त्रियांना खास भेट देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करायला हवा. या खास प्रसंगी आपण महिलांना कोणती भेटवस्तू द्यायला हवी याचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


आईला काय देता येईल?
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपण आपल्या आईचे प्रेम आणि समर्पण लक्षात ठेवले पाहिजे. यावेळी आपण आईच्या गरजेची कोणतीही वस्तू तिला भेट देऊ शकतो, जसे की स्वयंपाकघरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरातील सजावटीचे सामानही असू शकते. तसेच, तुमची इच्छा असेल तर तुम्ही दागदागिने, साड्या, पुस्तके किंवा जुन्या छायाचित्रांचा कोलाज बनवून गिफ्ट दिल्यास चालेल.


आपल्या बहिणीला आणि कुटुंबातील इतर स्त्रियांना 'ही' भेटवस्तू देऊ शकता
प्रत्येकाच्या जीवनात बहिणीचे स्थान खूप खास असते. कुटुंबात बहिणी सर्वात प्रिय असतात, हे कारण आहे की त्यांच्या भेटवस्तूंची यादी देखील मोठी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी बहिणला फिटनेस बँड, हँड बॅग, ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा कोणतीही गॅझेट देऊ शकता. आपण काही चांगली पुस्तके देखील देऊ शकता. या व्यतिरिक्त आपण घरात उपस्थित असलेल्या इतर महिलांना मोत्याचे हार किंवा अंगठीसारखे दागिने भेट देऊ शकता. अंगठ्या, कानातले, हार, ब्रेसलेट इत्यादि देखील महिलांना भेटवस्तू देऊन त्यांना खूश करू शकता.


जोडीदाराला काय द्याल?
महिला दिनाच्या खास दिवशी आपल्या जोडीदारालाही तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. या दिवशी आपली पत्नी किंवा एखाद्या मैत्रिणीला भेटवस्तू, गिफ्ट व्हाउचर, मेकअप किट, ब्युटी प्रॉडक्ट्स, गॅझेट्स किंवा सहलीची प्लॅन करुन सरप्राईज देता येईल. तसेच आपण आपल्या जोडीदारास लाँग ड्राईव्ह किंवा डिनरसाठीही बाहेर घेऊन जाऊ शकतो. स्त्रिया आपला बहुतेक वेळ स्वयंपाकघरात घालवतात. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा माणूस त्यांना स्वत:च्या हातांनी स्वयंपाक करुन खाऊ घालतो, तो क्षण त्यांच्यासाठी खूप आनंददायी होईल.


कार्यालयातील सहकाऱ्यांना खास भेट
ऑफिसमध्ये तुमच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना तुम्ही कप, कार्ड होल्डर, इयरफोन, ब्लूटूथ स्पीकर्स, लॅपटॉप बॅग, पेन, सेल्फी स्टिक्स इत्यादी भेटवस्तू देऊ शकता. याशिवाय तुम्ही त्यांना पाण्याची चांगली बाटली देऊ शकता जे त्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.