PM Modi G-20 Summit : रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) युद्धामुळे जागतिक तणाव निर्माण झाला आहे. इंडोनेशियातील बाली येथे आजपासून G20 शिखर परिषदेला (G-20 Summit) सुरू झाली आहे. G-20 शिखर संमेलनाच्या मंचावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM-Narendra-Modi) यांनी या युद्धादरम्यान दोन देशांमध्ये विभागलेल्या जगाला मोठा इशारा दिला. जागतिक व्यासपीठावर पहिल्यांदाच जमलेल्या रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींसमोर पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनला युद्धाबाबत मी वारंवार सांगत आलो आहे, युद्धविराम घेऊन शांततेच्या मार्गावर परतण्याचा मार्ग शोधावा लागेल. मोदी म्हणाले की, या युद्धामुळे जगात ऊर्जा, खत आणि अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. आज खत उपलब्ध झाले नाही, तर उद्या जगाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासेल, असा इशारा त्यांनी दिला.


कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी
पीएम मोदी म्हणाले, 'दुसऱ्या महायुद्धाने जगात हाहाकार माजवला होता. यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आता आपली पाळी आहे. कोरोना नंतर नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. शांतता, सुरक्षा आणि बंधुता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित आणि सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. भगवान बुद्ध आणि गांधीजींच्या पवित्र भूमीवर जी-20 ची बैठक होईल तेव्हा आपण जगाला शांततेचा ठोस संदेश देऊ, अशी मला खात्री आहे.



PM मोदींनी ज्यो बायडेन आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेतली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फ्रान्सचे नेते इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली. शिखर परिषदेचे उद्घाटन करताना, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी जागतिक नेत्यांना UN चार्टरचे पालन करण्यास सांगितले आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या संदर्भात "युद्ध" संपविण्याचे आवाहन केले.


अन्नसुरक्षेसाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
भारताच्या पंतप्रधानांनी जगाला इशारा दिला की, आजची खताची समस्या उद्याचे अन्न संकट आहे, ज्याच्यासाठी जगाकडे कोणताही उपाय नाही. ते म्हणाले की, अन्नधान्याचा पुरवठा स्थिर सुरू राहण्यासाठी आपल्याला परस्पर करार करावा लागेल. पंतप्रधान म्हणाले की, भारतातील अन्नसुरक्षेसाठी आम्ही नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहोत आणि बाजरीसारख्या पारंपारिक पिकांना प्रोत्साहन देत आहोत. बाजरी जागतिक कुपोषण आणि उपासमारीची समस्या सोडवू शकते.


भारत ऊर्जा आणि पर्यावरणासाठी वचनबद्ध
रशियाकडून तेल घेतल्याच्या टीकेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाच्या विकासासाठी भारताची ऊर्जा सुरक्षा देखील आवश्यक आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ऊर्जेच्या पुरवठ्यावर निर्बंध लादू नयेत, तसेच बाजारातील स्थिरता सुनिश्चित केली पाहिजे. भारत ऊर्जा आणि पर्यावरणासाठी वचनबद्ध आहे. त्यांनी सांगितले की 2030 सालापर्यंत भारत आपली निम्मी वीज नव्या स्रोतांमधून निर्माण करेल. या बदलासाठी तंत्रज्ञान आणि निधी कालबद्ध पद्धतीने द्यावा, असे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी