T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (England vs Pakistan) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. यापूर्वी 2010 च्या विश्वचषकात इंग्लंडनं टी-20 विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडनं भारताविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली होती. पण या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मान भारतीय संघानं मिळवलाय. तर, चॅम्पियन ठरलेला इंग्लंडचा संघ या यादीत तळाशी आहे. 

यंदाच्या टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी 37 षटकार मारले आहेत. या यादीत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या नावावर 30 षटकारांची नोंद आहे.  त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अनुक्रमे 28 आणि 25 षटकार मारले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या, दक्षिण आफ्रिकेचा संघ सातव्या आणि इंग्लंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

टी-20 विश्वचषक: सर्वाधिक षटकार

संघ षटकार
भारत 37
श्रीलंका 30
ऑस्ट्रेलिया 28
न्यूझीलंड 25
पाकिस्तान 25
दक्षिण आफ्रिका 23
इंग्लंड 22

 

टी-20 विश्वचषकविजेत्या संघाची यादी

आवृत्ती विजेता संघ वर्ष
पहिली आवृत्ती भारत 2007
दुसरी आवृत्ती पाकिस्तान 2009
तिसरी आवृत्ती इंग्लंड 2010
चौथी आवृत्ती वेस्ट इडीज 2012
पाचवी आवृत्ती श्रीलंका  2014
सहावी आवृत्ती वेस्ट इंडीज 2026
सातवी आवृत्ती ऑस्ट्रेलिया 2021
आठवी आवृत्ती इंग्लंड 2022

हे देखील वाचा-