PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. फ्रान्सच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron ) यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील पार पडली आहे.  राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'फ्रान्स हा संपूर्ण जगात मानवतेसाठी ओळखला जातो. तसेच फ्रान्समध्ये येऊन अभिमान वाटत असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.' 


फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आलेले पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'मला फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान सगळ्या 140 कोटी भारतीयांचा आहे. तसेच दहशतवादाच्या लढाईमध्ये भारत आणि फ्रान्सने कायमच एकमेकांची मदत केली आहे.' 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (13 जुलै) रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवसच्या सोहळ्यात देखील सहभाग घेतला. तसेच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह त्यांनी विशेष अतिथी म्हणून बॅस्टिल डे परेड या समारंभाला देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली. 


मार्सेल या शहरामध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरु करणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे. तर फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना दीर्घकालीन व्हिसा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. तसेच  फ्रेंच विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी आमंत्रित केले आहे. 


फ्रान्स आणि भारतामध्ये UPI करार


पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी  UPI संदर्भात करार करण्यात आला आहे.  त्यामुळे आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवी बाजारपेठ खुली होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.


बॅस्टिल डे परेडमध्ये पंजाब रेजिमेंट


 राष्ट्राअध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडमध्ये पंजाब रेजिमेंटला पाहून मला अभिमान वाटत आहे. आम्ही एका ऐतिहासिक विश्वासाच्या आधारावर पुढे जात आहोत. जागतिक संकटांवर मात करण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे मार्ग काढू. तसेच आम्ही तरुणांना देखील विसरु नाही शकत.  2030 पर्यंत आम्हाला 30,000 फ्रेंच विद्यार्थ्यांना भारतात पाठवायचे आहे.


हे ही वाचा : 


PM Modi France Visit : चीन आणि पाकिस्तानला भरणार धडकी! 26 राफेल-एम विमानं, 3 स्कॉर्पिन पाणबुड्या; भारताचा फ्रान्ससोबत 90 हजार कोटी रुपयांचा करार