Israel : इस्राईलमधील (Israel) जॉर्डन व्हॅली (Jorden Valley) येथील सुलेमान हसन या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एका अपघातामध्ये सुलेमान गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. पण त्याच्यावर डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्रक्रिया केली आहे. त्यामुळे सुलेमानला मिळालेल्या पुनर्रजन्मामुळे त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत 


नेमकं काय घडलं? 


सुलेमान नेहमीप्रमाणे त्याच्या घराजवळ सायकल चालवायला गेला होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या दिवशी त्याचा हा दिनक्रम त्याच्या जीवावर बेतले. तेव्हा त्याची एका वाहनाला टक्कर झाली आणि त्याचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेमुळेच त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. 


डॉक्टरांनी सुरुवातीला जेव्हा सुलेमानला तपासले तेव्हा त्याच्या डोकं आणि मानेमधील हाडांना गंभीर इजा पोहचली असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. तसेच त्याच्या ओटीपोटाला देखील इजा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्याच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमध्ये त्याचे डोके पुन्हा मणक्याशी जोडण्यात आले. त्यानंतर सुलेमानला एक नवं आयुष्य देण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. 


सुलेमानच्या मृत्यूची जवळपास 50 टक्के शक्यता होती. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुलेमानने त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी देखील डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुलेमानला मृत्यूच्या दरीतून वाचवून आणल्याबद्दल त्याच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार देखील मानले आहेत. 






भारतीय पुराणात अशाच एका शस्त्रक्रिया भगवान शंकराने केली असल्याचं सांगितलं जातंय. खरंतर अशी शस्रक्रिया केली होती भगवान शंकराने. पार्वतीने तिचा पुत्र घडवला खरा पण त्याची जराही कल्पना भगवान शंकरांना नव्हती. त्यामुळे गणपतीने त्यांना अडवल्याच्या रागाने त्यांनी त्याचे धड शरीरापासून वेगळे केले. पार्वतीला तिच्या पुत्राला असं पाहून एकच आक्रोश केला आणि भगवान शंकरांकडे तिच्या पुत्राचे प्राण पुन्हा मागितले. तेव्हा भगवान शंकरांनी गणपतील हत्तीचे धड बसवले आणि बुद्धीच्या देवतेचा जणू पुनर्जन्मच झाला. त्यानंतर गणपती, वक्रतुंड, विघ्नहर्ता म्हणून तो त्याच्या भक्तांच्या पाठिशी सदैव उभा आहे. 


सुलेमानच्या बाबतही काहीसं असंच घडलं असावं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण डॉक्टरांनी शंकराच्या रुपात येऊन पुन्हा त्याचे धड शरीराला जोडले आहे. फक्त यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. 


हे ही वाचा : 


अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संबंधाबाबत सामाजिक आणि संवैधानिक बदल आवश्यक :मुंबई उच्च न्यायालय