India-France Defence Deal : भारताची ताकद आणखी वाढली असून यामुळे शत्रू राष्ट्र चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) ला धडकी भरणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 90 हजार कोटींचा संरक्षण करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी फ्रान्ससोबतच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.  फ्रान्सकडून 26 राफेल-एम विमाने आणि तीन स्कॉर्पिन पाणबुडी विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.


भारताचा फ्रान्ससोबत 90 हजार कोटी रुपयांचा करार


पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. फ्रान्स आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांना 25 वर्ष पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पंतप्रधान मोदी यांना नॅशनल बास्तील परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं. या दौऱ्यावर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधि अधिक दृढ होण्यावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी सहाव्यांदा फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यावेळी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत 90 हजार कोटींच्या संरक्षण क्षेत्रासंबंधित करार होण्याची अपेक्षा आहे. 


26 राफेल-एम विमानं, 3 स्कॉर्पिन पाणबुड्या


या डिफेन्स डीलमध्ये भारताला 22 सिंगल सीट राफेल मरीन लढाऊ विमाने मिळण्याची अपेक्षा आहे. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यात येतील. त्याचबरोबर 4 ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. यासोबतच भारतात 3 स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या संयुक्त बांधणीवरही चर्चा होऊ शकते.


भारत-फ्रान्स संरक्षण करार


या संरक्षण कराराअंतर्गत भारताला फ्रान्सकडून 26 राफेल-एम ही समुद्री लढाऊ विमानं मिळणार आहेत. त्याशिवाय तीन स्कार्पिन श्रेणीतील पाणबुड्याही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नौदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेल विमानं खरेदी करण्यात आले असून लवकरच ही विमानं भारतीय नौदलात सामील होतील. भारतीय नौदल आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर 26 राफेल-एम विमानं तैनात करणार आहे, त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना चोख प्रत्यत्तर देता येईल.


चीन आणि पाकिस्तानला भरणार धडकी


भारत सातत्याने आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे. भारताने गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा भरणा केला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) सोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सैन्याची ताकद वाढवत आपले पाय भक्कम रोवताना दिसत आहे. त्यामुळे भारताचं हे पाऊल पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rafale-M Fighters : भारताची ताकद आणखी वाढणार! फ्रान्ससोबत Rafale M करार होण्याची शक्यता, कसं आहे राफेल-एम?