France: मानवी तस्करीच्या (Human Trafficking) संशयावरून फ्रान्सच्या (France) वेट्री एअरपोर्टवर (Paris Vatry Airport) थांबवण्यात आलेल्या लिजेंड एअरलाइन्सच्या (Legend Airlines) विमानाला अखेर तीन दिवसांनी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विमानात एकूण 303 प्रवासी होते, त्यापैकी बहुतांश प्रवासी भारतीय वंशाचे होते.


दरम्यान, विमान इंधन भरण्यासाठी वेट्री विमानतळावर उतरलं होतं. यावेळी फ्रेंच अधिकार्‍यांना विमानातून मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एअरपोर्टवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर फ्लाइटचे उड्डाण थांबवण्यात आलं. वेट्री विमानतळावरील रिसेप्शन हॉलचं वेटिंग एरियात रूपांतर करून सर्व प्रवाशांना तिथे थांबवण्यात आलं होतं. 


दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन करण्यात आली चौकशी 


अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना विमानतळाच्या एंट्री हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तसेच एंट्री हॉल बंद करण्यात आला होता. पोलिसांनी या भागांत इतर प्रवाशांना जाण्यास बंदी घातली होती, तसेच एंट्री हॉलबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या दोन प्रवाशांना शनिवारी पुन्हा 48 तास ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली, असं पॅरिसच्या सरकारी वकील कार्यालयानं सांगितलं आहे.  


क्रू मेंबर्सची चौकशी केल्यानंतर विमानतळ प्रशासनाचं समाधान                         


फ्रान्सहून टेक ऑफ करण्यापासून थांबवलेलं फ्लाइट लीजेंड एअरलाइन्सचं होतं. या घटनेनंतर, एअरलाइन्सचे वकील लिलियाना बाकायोको यांनी सांगितलं की, एअरबस A340 च्या सर्व क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात आली आणि त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली, त्यांनी याआधी सांगितलं की, जर सरकारी वकिलांनी एअरलाइन्सवर आरोप दाखल केले, तर ती खटला चालवेल.


निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?


निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


France Flight Indian Passenger : फ्रान्सने 303 भारतीय प्रवासी असलेले विमान केले जप्त; पॅरिस ते दिल्लीपर्यंत खळबळ!