Mark Zuckerberg House : मेटाचे (Meta) संस्थापक आणि सीईओ असलेल्या मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) अमेरिकातील हवाईमध्ये एका आयलँडवर टॉप-सिक्रेट अलिशान घर तयार करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्क झुकेरबर्ग तब्बल 1400 एकरमध्ये अलिशान घर तयार करत आहेत. 30 बेडरुम, 5000 फूट अंडरग्राऊंड बंकर तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय भाजी, फळं, दूधासह सर्वच गोष्टी उपलब्ध असतील.   द न्यू यॉर्करच्या वृत्तानुसार, झुकेरबर्ग यांची ही प्रॉपर्टी हवाईच्या क्वाय बेटावर आहे. येथे झुकेरबर्ग यांनी अलिशान घराची निर्मिती सुरु केली आहे. त्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 270 मिलियन डॉलर (भारतीय रुपयांत अंदाजे किंमत- 22,500,517,500 ) आहे. त्यामध्ये जमीनीच्या किमतीपासून बांधकामाच्या पैशांचाही समावेश आहे. झुकेरबर्ग यांचं हे घर जगातील सर्वात महागड्या प्रॉपर्टीमध्ये येते. 


5000 फूट अंडरग्राऊंड बंकर 


मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या सिक्रेट बंगल्यात आर्श्चयचकीत करणारे फिचर्स आहेत. त्यामध्ये एक अंडरग्राऊंड बंकरही तयार केलेय. वायर्डकडून मिळालेल्या सार्वजनिक कागदपत्रातील माहितीनुसार, परिसरामध्ये डझनहून अधिक इमारती असतील, प्रत्येकामध्ये किमान 30 बेडरूम आणि 30 बाथरूम असतील. रिपोर्ट्सनुसार,  झुकरबर्ग यांच्या अलिशान घरामध्ये 5,000 स्क्वेअर-फूट बंकरचा समावेश आहे, ज्याचा स्वतःचा ऊर्जेचा स्रोत आहे. याशिवाय या इमारतीत 18 फूट उंचीची पाण्याची टाकी तसेच पंप यंत्रणाही असणार आहे.


फुटबॉल ग्राऊंड इतका मोठा प्लोअर - 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिक्रेट बंगल्यात प्रामुख्याने दोन परिसर आहेत. त्याचा एकूण परिसर फुटबॉल मैदानाइतका (57,000 वर्ग फूट) मोठा आहे. त्यामध्ये डझनभर लिफ्ट असतील. त्यासोबत ऑफिस कॉन्फर्स रुम यासारख्या अनेक गोष्टी असतील.  


किचन आहे सर्वात खास, शेकडो पाहुणे एकाच वेळी बसतील - 


मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) आणि त्यांची पत्नी प्रिसिला चान (Priscilla Chan) यांनी जगातील सर्वात महागड्या घराची निर्णीती करत आहेत. या सिक्रेट घराचं किचनही खास आहे. कॉम्प्लेक्समधील दोन्ही इमारतींमध्ये भव्य किचन तयार केले जात आहेत. एकाच वेळी शेकडो लोकांना जेवण करता येईल, इतकं मोठं किचन असेल. 


पशुपालन अन् शेती - 


अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केलाय की, मार्क झुकेरबर्ग यांच्या या प्रॉपर्टीमध्ये शेतीपासून पशुपालन यासारख्या बाबींचाही समावेश करण्यात आलाय. 1400 एकरमध्ये असलेल्या प्रॉपर्टीच्या काही भागात पशुपालन केले जाईल. त्याशिवाय शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारची फळं, भाजीपालासह इतर खाद्य पदार्थाचं उत्पादन केले जाणार आहे. 


सर्व सिक्रेट, कुणाला काही सांगण्यासही मनाई - 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्क झुकेरबर्ग यांच्या प्रॉपर्टीमध्ये अत्यंत गुपचूप काम सुरू आहे. याबाबत कामगारांना कोणाशीही बोलण्यास मनाई आहे. जर कोणी या इमारतीबद्दल मीडिया किंवा इतर कोणाला काही उघड केले तर त्याला ताबडतोब काढून टाकले जात आहे.  रिपोर्टमध्ये एका माजी कंत्राटदाराच्या हवाल्याने याबाबत सांगितले. त्यात म्हटले आहे की, "हा एक फाईट क्लब आहे. आम्ही फाइट क्लबबद्दल बोलत नाही. कामगारांना कामाबद्दल इतर कर्मचार्‍यांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. "