लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होता. या फोटोत मलाला जीन्स पँट, जॅकेट आणि हेड स्कार्फ अशा वेशभूषेत दिसत आहे. परंतु मलालाच्या कपड्यांमुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला आहे.
मलालाच्या कपड्यांमधील बदलाचं स्वागत करत ती सामन्य मुलीप्रमाणेच दिसत आहे, असं काहींनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मलालाचे कपडे पाकिस्तानी मुलीसाठी लाजिरवाणं असल्याचं काहींच मत आहे.
कपड्यांवरुन तिला ट्रोल करायला सुरुवात केली. पॉर्नस्टार मिया खलिफाशी तिची तुलना करुन ट्रोलर्सनी टोक गाठलं.
फोटोत दिसणारी मुलगी मलालाच आहे की दुसरी कोणी हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पाकिस्तानी वेबसाईट 'Siasat.pk' ने मलाला युसुफजई युकेमध्ये या कॅप्शनसह तिचा जीन्स घातलेला फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा फोटो तुफान व्हायरल होत असून हजारोंनी त्यावर कमेंट केली आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी, अधिकारांसाठी लढा देणाऱ्या मलाला युसुफजईला 2014 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 20 वर्षीय मलाल सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिक्स, फिलॉसॉफी आणि इकॉनमिक्स शिकत आहे.