Russia Ukraine Conflict : मॅकडोनाल्ड्सने (McDonalds) रशियामधील सर्व 850 रेस्टॉरंट्स तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर रेस्टॉरंट्स बंद करण्याच्या शेवटच्या क्षणी मॅकडोनाल्डसमध्ये लोकांची गर्दी झाली होती. गोल्डन आर्चच्या बाहेरील परिसराती काही फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावरही अनेक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मॅकडोनाल्डसच्या आउटलेटवर गर्दी पाहून विश्वास बसणे कठीण आहे. ही गर्दी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.


ऑनलाइन बर्गर विकणाऱ्या अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सने तर नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मॅकडोनाल्ड्सच्या बर्गरसाठी लोक जास्तीत जास्त पैसे मोजायलाही तयार आहेत. रशियामध्ये मॅकडोनाल्ड्स बर्गरची इतकी क्रेझ आहे की, इथे एका बर्गरसाठी लोक लाखो रुपये मोजायलाही तयार आहेत. तीन किंवा चार बर्गर 26,000 रुपयांमध्ये (40,000 रूबल) विकले जात आहेत. इतकंच नाही तर कोका-कोलाही सुमारे 1,000 ते 1,500 रुपयांना विकला जात आहे.






 


मॅकडोनाल्डस ही जगातील प्रमुख खाद्य आणि पेय कंपन्यांपैकी एक आहे. मॅकडोनाल्डसने रशियातील आपले 850 रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा केली. युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. रशियावर सर्वत्र टीका होत आहे. मॅकडोनाल्डसनेही रशियाच्या या निर्णयावर टीका करत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॅकडोनाल्डसने रशियातील आपले रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर McDonald बाहेर रशियन नागरिकांचा रांगच रांग पाहायला मिळाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha