Afghanistan Terrorism: पाकिस्तानने अफगाणिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानने रविवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधून सीमेपलीकडून हल्ल्यांमध्ये त्यांच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे. यावरून त्यांनी आता शेजारील देशातील तालिबान शासकांना अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अलीकडील घटनांबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाकचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत पाक-अफगाण सीमेवर घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तान सरकारला पाक-अफगाण सीमा क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी वारंवार विनंती केली आहे. कारण दहशतवादी पाकिस्तानमध्ये त्यांच्या कारवाया करण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यांच्या सीमेवर प्रभावी समन्वय आणि सुरक्षेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा करत आहेत. दुर्दैवाने टीटीपी (तेहरिक-ए-तालिबान) सह सीमावर्ती भागातील प्रतिबंधित दहशतवादी गटांचे घटक पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा चौक्यांवर हल्ले करत आहेत, असे पाक परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी निर्भयपणे काम करणाऱ्या दहशतवाद्यांचा पाकिस्तान पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो, असे पाक परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानच्या सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना या कारवाया हानिकारक असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानला पाक-अफगाण सीमा क्षेत्र सुरक्षित करण्याचे आणि दोन्ही देशांच्या शांतता आणि प्रगतीच्या हितासाठी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, याआधी पाकिस्तानी विमानांनी शुक्रवारी उशिरा अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील खोस्त आणि कुनार प्रांतांवर बॉम्बफेक केल्याचे वृत्त होते, ज्यात नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची चर्चा. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jammu Kashmir Encounter : अनंतनागमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कराचा जवान शहीद, ऑपरेशन सुरूच
- Russia Ukraine War : कीव्हमध्ये 900 हून अधिक मृतदेहांचा खच, रशियन सैन्य माघारी परतल्यानंतरच वास्तव
- Russia-Ukraine War : रशियन सैन्याकडून लिसिचान्स्क शहरातील तेल शुद्धीकरण केंद्रावर बॉम्बहल्ला, 24 तासांत 8 शहरांवर हल्ले