Rachna Sachdeva Korhonen : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी भारतीय वंशाच्या रचना सचदेव कोरहोनेन (Rachna Sachdeva Korhonen) यांची माली (Mali) येथील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या एका महिन्यात अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळालेले हे तिसरे नामांकन आहे. कोरहोनेन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात यूएस फॉरेन सर्व्हिसमधून केली. सध्या त्या यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या जॉइंट एक्झिक्युटिव्ह ब्युरो फॉर नियर ईस्टर्न अफेयर्स आणि दक्षिण आणि मध्य आशियाई ब्युरोचे उप सहाय्यक सचिव आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Continues below advertisement

व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, रचान सचदेव यांनी यापूर्वी सौदी अरेबियातील धारण येथील यूएस वाणिज्य दूतावासात महावाणिज्यदूत आणि प्रमुख अधिकारी म्हणून काम केलं आहे. त्यांनी कोलंबोमधील यूएस दूतावासाच्या व्यवस्थापन कक्षाचं नेतृत्वही केलं. तसेच त्यांनी वॉशिंग्टनमधील व्यवस्थापनाच्या अवर सचिवांचे विशेष सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, बायडेन यांनी भारतीय वंशाच्या पुनीत तलवार (Punit Talwar) यांची मोरोक्कोचे (Morocco) राजदूत आणि भारतीय वंशाच्या राजकीय कार्यकर्त्या शेफाली राजदान दुग्गल (Shefali Razdan Duggal) यांची नेदरलँड्समध्ये (Netherlands) राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha