Jammu Kashmir Encounter : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) दहशतवादी (Terrorists) आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत (Encounter) एक जवान शहीद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली आहे. काश्मीरच्या दक्षिण भागातील कोकरनागमधील वटनार परिसरात सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यावर कारवाई करत परिसरात नाकेबंदी करत शोध मोहिमेला सुरवात केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. अद्यापही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती आहे. चकमकीत सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला आहे.
शोपियानमध्येही दोन जवान शहीद
याआधी 14 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu Kashmir) शोपियानमध्ये (Shopian) दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमधील बडगामच्य जैनपुरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. अजूनही अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Jahangirpuri Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना
- Petrol Diesel Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
- America : भारतीय वंशाच्या रचना सचदेव यांची मालीच्या राजदूत पदी नियुक्ती, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha