एक्स्प्लोर

Pulwama terror attack : आम्हाला काय मिळणार? पाकिस्तानचा सर्वात ढोंगी प्रश्न

फाळणीसारखी भळभळती जखम देऊन जन्माला आलेल्या या देशाचा खोटारडेपणा फक्त भारतानेच नाही तर साऱ्या जगाने अनुभवला आहे. त्यामुळेच इम्रान साहब पाकिस्तानला काय मिळणार, हा प्रश्न तुम्ही खरं तर पाकिस्तान आर्मीला, आयएसआयला, तिथल्या जिहादी अतिरेकी संघटनांना विचारलं असतात तर बरं झालं असतं?

मुंबई : पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विचारलं पुलवामासारखा अतिरेकी हल्ला करुन आम्हाला काय मिळणार? या शतकातला सर्वात ढोंगी प्रश्न म्हणून या प्रश्नाची निवड करायला हवी. वरकरणी अत्यंत साधा, सोपा वाटणारा... त्रयस्थ माणसाची, नव्या पिढीची दिशाभूल करणारा हा प्रश्न. जन्मापासून भारताला जखमी करायची एकही संधी ज्या देशातील आर्मीने आणि नेत्यांनी सोडली नाही तो देश निरागसपणाचा आव आणून विचारतोय, आम्हाला काय मिळणार? दहशतवाद हेच ज्या देशाचं प्रमुख आयात-निर्यात धोरण राहिलंय त्या देशाचा पंतप्रधान अजाणतेपणाचं ढोंग घेऊन आज विचारतोय , आम्हाला काय मिळणार? जिथे दाऊद इब्राहिम, मसूद अजहर, हाफिज सईद सारखे अतिरेकी पोसले जातात तो देश आज विचारतोय, आम्हाला काय मिळणार? जन्मापासून कधी अमेरिकेचा तर कधी चीनचा हस्तक म्हणून जगणारा देश आज विचारतोय, आम्हाला काय मिळणार? एकतर इम्रान खान यांनी इतिहास नीट वाचला नसेल किंवा त्यांचं ज्ञान भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांपुरतं मर्यादित असेल. त्यांच्यासाठी छोटीशी उजळणी... तुम्ही म्हणताय, पाकिस्तानला काय मिळणार? 1947 पासून भारत द्वेष करुन पाकिस्तानला काय मिळालं इम्रान साहब... तेच तालिबानला जन्म देऊन पोसून काय मिळालं इम्रान साहब?  तेच 1988 पासून काश्मीरचं नंदनवन उजाड करुन काय मिळालं... तेच जागतिक दहशतवादाचा Evil Axis बनून काय मिळालं? तेच ओसामा बिन लादेनला घरात लपवून काय मिळालं? तेच 1992 ला मुंबईत बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पाठवून जे मिळालं... तेच गेली तीन दशकं भारताचा दुश्मन दाऊद इब्राहिमला आश्रय देऊन मिळालं...तेच एकीकडे शांततेची कबुतरं उडवून लगेच कारगील युद्ध करुन मिळालं.. तेच 26/11 मुंबई हल्ल्याच्या रेकीसाठी डेव्हिड हेडलीला पाठवून मिळालं.. तेच 10 अशिक्षित अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन मुंबई हल्ला करुन मिळालं.. तेच फाळणीसारखी भळभळती जखम देऊन जन्माला आलेल्या या देशाचा खोटारडेपणा फक्त भारतानेच नाही तर साऱ्या जगाने अनुभवला आहे. त्यामुळेच इम्रान साहब पाकिस्तानला काय मिळणार, हा प्रश्न तुम्ही खरं तर पाकिस्तान आर्मीला, आयएसआयला, तिथल्या जिहादी अतिरेकी संघटनांना विचारलं असतात तर बरं झालं असतं? पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?ABP Majha Headlines :  10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूरTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Ravi Pradosh Vrat 2024 : पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
Embed widget