Imran Khan Income : पाकिस्तानमध्ये (Pakistan) सत्तेतून पायउतार झाल्यानंतप इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या संपत्ती आणि उत्पन्नाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान तहकीक-ए-इंसाफने केंद्रीय सचिवालयातील कर्मचारी ताहिर इक्बाल, मोहम्मद नोमान औझल, मोहम्मद अर्शद आणि मोहम्मद रफिक यांच्या खात्यांचीही तपासणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. द न्यूज इंटरनॅशनलने आपल्या वृत्तपत्रात यासंदर्भात माहिती दिली आहे.
वृत्तपत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांना इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या आंतरराष्ट्रीय बँक खात्यांचा तपशील मागवण्यास सांगितले आहे. सरकार इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयला 2013 पासून विदेशातून मिळलेल्या निधीची चौकशी करणार असल्याचे बोललं जात आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या चार पक्ष कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम आल्याची नोंद सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानकडून मागवली जात आहे. एवढेच नाही तर पुराव्याच्या आधारे त्यांना अटकही होऊ शकते.
डेटा एक्सचेंज प्रकरणाची चौकशी
या प्रकरणातील फॉरेन्सिक तपासणी स्वतंत्रपणे केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) आणि पाकिस्तान कायदा अंमलबजाबणी संस्था म्हणजे फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (FBR) त्यांच्या पातळीवर कारवाई करेल. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी अर्थमंत्री इशाक दार यांच्या कार्यकाळात डेटा एक्सचेंज करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारानुसार, एफबीआरला परदेशी बँकांकडून रेकॉर्ड गोळा करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, नॉर्वे, फिनलंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया तसेच इतर परदेशी खात्यांचे रेकॉर्ड घेण्यात येणार आहे.
इम्रान यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप
इम्रान खान यांचे जुने सहकारी अलीम खान आणि जहांगीर खान तरीन यांनी यापूर्वी इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. याला प्रत्युत्तर देत इम्रान खान यांनी सध्याच्या सरकारवर हल्ला केला आणि जुन्या सहकाऱ्यांवर आपल्या कार्यकाळात बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :