एक्स्प्लोर

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताविरुद्धचा पाकिस्तान-चीनचा डाव फसला!

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताविरुद्ध पाकिस्तानने चीनच्या साथीने रचलेला डाव फसला. दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश आलं नाही

नवी दिल्ली : चीनच्या मदतीने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्ये भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि चीनचा हा नापाक डाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उधळला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने पुराव्यांअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला. चीनच्या मदतीने भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा हा काही पहिला प्रयत्न नाही. याआधीही पाकिस्तानने अशा कुरापती केल्या आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बुधवारी (2 सप्टेंबर) 1267 अल कायदा प्रतिबंध समितीनुसार दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचे इस्लामाबादचे प्रयत्न फेटाळले.

अंगरा अप्पाजी आणि गोबिंद पटनायक या दोन भारतीय नागारिकांना दहशतवादी घोषित करण्याचे पाकिस्‍तानचे प्रयत्न, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमने टेक्निकल होल्डच्या माध्यमातून रोखले. या प्रकरणात पुरावे सादर करा, अशी मागणी या देशांनी पाकिस्तानकडे केली होती.

स्वत:प्रमाणे भारताची प्रतिमा बिघडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. परंतु भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पाकिस्तानकडे कोणतेही पुरावे नव्हते. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरला 1267 समितीने जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात भारताचा मोठा वाटा होता. भारताच्या या यशानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

पाकिस्‍तानकडून चार भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न खरंतर पाकिस्‍तानने अंगरा अप्पाजी, गोबिंद पटनायक, वेणुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या एकूण चार भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्‍तान अफगाणिस्‍तानातील विकासकामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवत आहे. या नागरिकांवर पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करुन त्यांचा संबंध दहशतवादी घटनांशी जोडत आहे. पाकिस्‍तानचे हे चारही प्रस्‍ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्‍यांनी फेटाळल्यानंतर पाकिस्तानची समितीसमोर पोलखोल झाली आहे.

मागच्या वेळेप्रमाणे यावेळी पाकिस्‍तानला भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देता आले नाहीत. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्‍तान तोंडावर आपटल्यानंतर यूएनमधील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस त्रिमूर्ती यांनी ट्वीट करुन म्हटलं की, "दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचे पाकिस्‍तानचे प्रयत्न सुरक्षा परिषदेने धुडकावले आहे. पाकिस्‍तानचा हा नापाक डाव ब्लॉक करणाऱ्या देशांचे आम्ही आभार मानतो."

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Embed widget