Pak PM Imran Khan : बटाटा-टोमॅटोचे भाव तपासण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, तर...
Pak PM Imran Khan : बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात सामील झालो नाही.
Pak PM Imran Khan : पाकिस्तानातील (Paksitan) जनता वाढत्या महागाईने हैराण झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी संताप व्यक्त करत, 'बटाटा-टोमॅटोचे'चे भाव (Potato and Tomato Rates) तपासण्यासाठी आपण राजकारणात (Politics) आलो नाही. विरोधी पक्षांकडून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणल्याबद्दल विरोधी पक्षांवर निशाणा साधताना खान म्हणाले.
पाकिस्तान एक महान देश बनणार आहे...
पंजाब प्रांतातील हाफिजाबाद शहरात एका राजकीय सभेला संबोधित करताना, इम्रान खान म्हणाले की, "विरोधक त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांविरोधात देश उभा राहील. इम्रान सरकारच्या उर्वरित काळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच "बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात सामील झालो नाही. देशातील तरुणांच्या हितासाठी मी सामील झालो. जर आपल्याला महान देश घडवायचा असेल तर आपल्याला सत्याला सामोरे जावे लागेल आणि हेच मी गेल्या 25 वर्षांपासून सांगत आहे. इम्रान खान यांच्या भाषणाच्या काही दिवस आधी संयुक्त विरोधी आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव यशस्वी करण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्यासाठी नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आज भेटणार आहेत. असे खान म्हणाले
माझा कोणताही वैयक्तिक फायदा झाला नाही
क्रिकेटरमधून राजकारणात एंट्री घेतलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी त्यांनी देशातील तरुणांच्या हितासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. असे करून आपला कोणताही वैयक्तिक फायदा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. याचे कारण असे की एखाद्या व्यक्तीला जे काही मिळण्याचे स्वप्न असते ते त्यांच्याकडे आधीपासूनच होते. ‘सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भ्रष्ट आणि दोषी राजकारण्यांना रोखण्याची जबाबदारी सरकार आणि न्यायव्यवस्थेची आहे, असेही इम्रान खान म्हणाले. ते म्हणाले की, जे त्यांना पंतप्रधानपदावरून हटवू पाहत आहेत ते त्यांच्याच कारस्थानाला बळी पडतील. विरोधकांवर निशाणा साधत- इम्रान खान यांनी आपल्या भाषणात जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) प्रमुख मौलाना फजलुर रहमान, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) सुप्रीमो नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यावर आसिफ यांच्यावर टीका केली.
2023 मध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूक - दरम्यान, 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये पंतप्रधानांना हटवण्यासाठी विरोधकांना 272 मतांची आवश्यकता आहे. पाकिस्तानमध्ये आता पुढील सार्वत्रिक निवडणूक 2023 मध्ये होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानात आजचे टॉमेटो आणि बटाट्याचे दर असे आहेत.
बटाटा (aaloo) 1 Kg 20.00
टॉमेटो (tamaatar) 1 Kg 40.00