(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Operation Ganga : परिस्थिती गंभीर असताना युक्रेनमधून 22,500 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात आणले; परराष्ट्र मंत्र्यांची लोकसभेत माहिती
Russia Ukraine War : भारतीय दूतवासाने 15, 20 आणि 22 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी नियमावली जारी केली.
Russia Ukraine War : रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine Conflict) हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत रशिया-युक्रेन युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. या कठीण परिस्थितीत युक्रेनवरून भारताने 22,500 विद्यार्थी परत आणले आहेत युद्धादरम्यान परतलेल्या विद्यार्थ्यांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संसदेत माहिती दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा
एस जयशंकर म्हणाले, विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करत होतो. अनेक अडचणींचा यावेळी सामना करावा लागला. तरी आम्ही नागरिकांना सुरक्षित मायदेशात आणले. विद्यार्थ्यांना परत आणताना समोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आम्ही ऑपरेशन गंगाची सुरूवात केली आहे. कठीण काठात यशस्वीरित्या राबवलेले हे मोठे ऑपरेशन होते. भारतीय दूतवासाने 15, 20 आणि 22 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी नियमावली जारी केली. सतत जाहीर होणाऱ्या नियमावलीमुळे अनेक विद्यार्थी बाहेर पडत होते. त्यांना आपले शिक्षण अर्धवट राहण्याचे भीती होती.
External Affairs Minister Dr. S Jaishankar makes a statement on the situation in #Ukraine & Operation Ganga in Lok Sabha.#UkraineRussiaCrisis pic.twitter.com/COqsAQlixx
— ANI (@ANI) March 15, 2022
रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती खराब होती त्यावेळी 18000 पेक्षा अधिक विद्यार्थी अडकले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन भारतासह युक्रेनमधील दूतवासात एक कॉल सेंटर स्थापन करण्यात आले. युक्रेनमधील हवाई क्षएत्र बंद करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भारतातून अधिकाऱ्यांना युक्रेन शेजारील देशांच्या सीमेवर पाठवण्यात आल्याची माहिती एस. जयशंकर यांनी दिली आहे.
जयशंकर पुढे म्हणाले, ऑपरेशन गंगा ज्या वेळी सुरू होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत बैठका घेत होते. या दरम्यान सर्व मंत्रालयांचा सपोर्ट मिळाला आहे. जेव्हा युक्रेनमध्ये परिस्थिती खराब होण्यात सुरूवात झाली त्यावेळी जानेवारी 2022 मध्ये भारतीयांचे रजिस्ट्रेशन करण्यास सुरूवात केली,