Omicron Variant Alert : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron )व्हेरिएंटमुळे जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटने (WHO) च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय की, सध्या सर्वात जास्त भर टेस्टींग, टॅक्रिंग आणि टेसिंगवर द्यायला हवा. त्यांनी पुढे सांगितलं की, 'ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस प्रभावी नसल्यानं सध्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण वाढलंय. मात्र, असा कोणताही व्हेरिएंट नाही ज्याला लस पूर्णपणे निष्प्रभावी करू शकते. लस तुमच्या शरीरात अँन्टीबॉडीज तयार करते ज्या तुम्हांला विषाणूशी लढण्यात मदत करतात. त्यामुळे अद्याप ज्या लोकांनी लस घेतली नसेल त्यांनी आवर्जून लस घ्यावी.' डॉ. स्वामीनाथन यांनी अनुवांशिक रचना (Genome Sequencing) वर लक्ष केंद्रीय करण्याचं म्हटलं आहे.


ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचं मत
1. जीनोम सिक्वेंसिंग गरजेच
कोरोनाबाधितांमध्ये पाच टक्के केसमध्ये अनुवांशिक रचना (Genome Sequencing) आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अचानक कोरोनारुग्ण वाढले आहेत किंवा कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत अशा भागांमध्ये जिनोम सिक्वेंसिंग व्हायला हवं. 


2. परदेशातून आलेल्या व्यक्तींची पुन्हा चाचणी करावी
कोणत्याही व्हेरिएंटमुळे एखाद्या देशातील प्रवासावर बंदी घालणं योग्य नाही. केवळ आफ्रिकेतूनच या व्हेरिएंटचा प्रसार होऊ शकतो असं नाही. या यादीमध्ये अनेक देश वाढत आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तीकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरीही पुन्हा दोन किंवा चार दिवसांनी चाचणी व्हायला हवी. 


3. डेल्टा व्हेरिएंटही प्रकार बदलेल का? 
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे डेल्टा पुन्हा प्रकार बदलेल का असा सवाल आता उपस्थित होतोय. डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलं की, याबाबत आता काही बोलणं योग्य ठरणार नाही. व्हेरिएंटचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी काही कालावधी लागेल. काही आठवड्यांच्या निष्कर्षानंतर नवा व्हेरिएंट आणि त्याभोवती फिरणाऱ्या इतर प्रश्नांची उत्तरे मिळतील.


आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाबाबत निर्बंधांबाबत विचार
कर्नाटकसह अनेक राज्यांनी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 15 डिसेंबरपासूनच आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याच्या निर्णयाचा आढावा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय, विदेशातून आलेल्या व्यक्तींची चाचणी आणि निरीक्षण कठोर करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. पण सध्या भारतात जीनोम सिक्वेन्सिंगबाबत विचार करण्यासाठी यात्रेकरुंचं प्रमाण कमी आहे. ज्या 65 हजार नमुन्यांपैकी केवळ 5 हजार व्यक्तीचं परदेशातून आल्याचं समोर आलं.


भारतात अद्याप ओमिक्रॉनचा शिरकाव नाही
एनसीडीसीने स्पष्ट केलं आहे, 'जुने नमुने पुन्हा तपासले असता भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला नसल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रितेकून बंगळुरुमध्ये परतलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन नाही, तर डेल्टा व्हेरिएंट आढळल्याचं सांगतलं आहे.'


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha