Omicron Variant First Image : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला फोटो समोर आलाय. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचं समोर आलेय. इटलीची राजधानी रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फोटो प्रकाशित केलाय. दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (B.1.1.529) जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातील देश सतर्क झाले असून हवाई वाहतूकीवर निर्बंध लावले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोक चिंतेत असतानाच पहिला फोटो समोर आलाय. या व्हेरिएंटचं म्युटेशन इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे. 


ओमिक्रॉनच्या फोटोत नेमकं काय आहे?
नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करणाऱ्या टीमने म्हटलेय की, ओमिक्रोन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेट होत असल्याचं आपण फोटोमध्ये पाहू शकतो. हा व्हायरस प्रोटीनच्या वरच्या भागात राहतो. जो मानवी कोशिकांवर प्रभाव टाकतो. 


ओमिक्रॉन धोकादायक आहे का? 
जास्त म्युटेट होतोय, याचा असा अर्थ नाही की ओमिक्रॉन अधिक धोकादायक आहे. विषाणूंनी फक्त दुसरा प्रकार निर्माण करून मानवी प्रजाती अधिक अनुकूल बनवली आहे. यासोबतच ते म्हणाले की, या व्हेरिएंटवर आणखी संशोधन सुरु आहे. संशोधन झाल्यानंतरच हा व्हेरिएंट धोकादायक आहे का नाही? हे आम्ही सांगू शकतो.  


जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलं?
WHO  च्या मते, सुरुवातीच्या पुरव्यात असं समोर आलेय की, जे लोक आधीच कोरोनाबाधित आहेत, ते पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित होऊ शकतात. ओमिक्रॉनमुळे पुन्हा संक्रमाणाची भीती आहे.  
डेल्टा अथवा दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे जास्त संसर्ग होत असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत आरटीपीएसीआर टेस्टच्या आधारावरच ओमिक्रॉन व्हेरिएंट झालाय की नाही, हे समोर आलेय.  
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कोरोना प्रतिबंधक लसीवर काय परिणाम होतो, यासाठी जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे.
ओमिक्रॉनच्या संक्रमणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतात की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची वेगळी लक्षणं असल्याचेही समोर आलेलं नाही.  
दक्षिण आफ्रिकामधील रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालेय. पण फक्त ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळेच रुग्णाची संख्या वाढत असल्याचेही समोर आलेलं नाही. इतर व्हेरिएंटचे आणि समूह संसर्गामुळेही रुग्णामध्ये वाढ झालेली असू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता समजण्यासाठी आणखी काही दिवस अथवा आठवडे लागू शकतात.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha