Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron) चा धोका जगभरात वाढत चालला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता अनेक देशानं आंतरराष्ट्रीय प्रवासांवर निर्बंध आणले आहेत. यातच आता अमेरिकेनंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी, अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 24 तास आधी कोविड 19ची चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असेल. शिवायस प्रवाशांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, असे निर्बंध लावण्यात आले आहेत. हा नवा नियम पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 72 तासांआधीचा कोरोनो निगेटिव्ह अहवाल बंधनकारक होता.
न्युयॉर्कमध्ये ओमायक्रॉनचे पाच बाधित
न्युयॉर्कमध्ये ओमायक्रॉनचे पाच बाधित रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. न्युयॉर्कमधील वाढत्या रुग्णबाधितांचे प्रमाण पाहता राज्यपालांनी आणीबाणी लागू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
25 देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग
ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग जगभरात फैलावत आहे. आता अमेरिका (US) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्येही ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. अमेरिकेत 5, बोत्सवानामध्ये 19, दक्षिण आफ्रिकेत 77, नायजेरियामध्ये 3, यूकेमध्ये 22, दक्षिण कोरियामध्ये 5, ऑस्ट्रेलियामध्ये 7, ऑस्ट्रियामध्ये 1, बेल्जियममध्ये 1, ब्राझीलमध्ये 3, चेक रिपब्लिकमध्ये 1, फ्रान्समध्ये 1, जर्मनीमध्ये 9 , हाँगकाँगमध्ये 4, इस्रायलमध्ये 4, इटलीमध्ये 9, जपानमध्ये 2, नेदरलँडमध्ये 16, नॉर्वेमध्ये 2, स्पेनमध्ये 2, पोर्तुगालमध्ये 13, स्वीडनमध्ये 3, कॅनडात 6, डेन्मार्कमध्ये 4 आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक ओमायक्रॉनबाधित आढळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : अमेरिकेत ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय? न्यूयॉर्कमध्ये पाच बाधित आढळले
- Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण
- ओमिक्रॉन फैलावतोय! अमेरिका, UAEसह 25 देशांमध्ये संसर्ग, पाहा यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha