Omicron Variant in US:
न्यूयॉर्कमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना महासाथ पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत होती. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क राज्यात आपत्ती आणीबाणी लागू करण्याची घोषणा राज्यपालांनी केली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता दुसरीकडे ओमायक्रॉन (Omicron)बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. क्वीनसमध्ये दोन, सफोक काउंटी व ब्रुकलिनमध्ये एक, न्यूयॉर्क शहरात एका बाधिताची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षी जानेवारीत अमेरिकेत पहिला कोरोनाबाधित आढळल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग फैलावला होता. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील कोरोना महासाथीचे केंद्र झाले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याची स्थिती होती. आता मात्र, पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली होती.
जर्मनीत लस नाही तर काहीच नाही!
जर्मनीत लस न घेतलेल्या नागरिकांना सरकारने धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. लस न घेतलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लस न घेतलेल्या नागरिकांना दोन-तीन अत्यावश्यक ठिकाणं वगळता कुठेही जाता येणार नाही. फक्त लसीकरण झालेले आणि कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्यानांच सर्व ठिकाणी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण
ओमिक्रॉन फैलावतोय! अमेरिका, UAEसह 25 देशांमध्ये संसर्ग, पाहा यादी