एक्स्प्लोर
ओदिशातील 'त्या' पतीला बहारेनच्या पंतप्रधानांची मदत
मनामा : ओदिशातील आदिवासी दाना माझी यांच्यावर पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे 10 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली. हृदय हेलावणाऱ्या या घटनेनंतर देशभरातून एकीकडे हळहळ आणि संतापही व्यक्त केला गेला. मात्र बहारेनच्या पंतप्रधानांनी माझी यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
बहारेनचे पंतप्रधान प्रिन्स खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी दाना माझी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ केल्याचं वृत्त आहे. 'माझी यांच्यासंदर्भातील बातमी पंतप्रधानांनी वाचली. या परिवारासाठी काहीतरी करायला हवं, अशी हताश भावना त्यांनी व्यक्त केली. फक्त इच्छा व्यक्त न करता त्यांनी बहारेनमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी काही रक्कम माझी कुटुंबाला दिली' असं 'गल्फ डेली न्यूज'ने म्हटलं आहे.
अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर, मुलीसह 10 किमी पायपीट
दाना माझी या आदिवासी व्यक्तीच्या पत्नीचा टीबीमुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र हा मृतदेह घरी नेण्यासाठी त्यांना अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो घरी नेणं गरजेचं होतं. मात्र वाट पाहूनही अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने माझी यांच्यावर पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमीपर्यंतची पायपीट करण्याची वेळ आली. माझी यांनी पत्नीला कार्पेटमध्ये गुंडाळून खांद्यावर टाकून गावात नेलं. यावेळी त्यांची 12 वर्षांची मुलगीही सोबत होती. ओडिशामध्ये नवीन पटनाईक सरकारने ‘महापरायण’ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयात मृत्यू झाल्यास, मृतदेह मोफत घरापर्यंत पोहोचवला जातो.संबंधित बातम्या :
बसमध्ये पत्नीचा मृत्यू, मृतदेहासह पतीला जंगलात उतरवलं
प्रसुतीसाठी पुराच्या पाण्यातून गर्भवतीची 6 किलोमीटर पायपीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement