एक्स्प्लोर
फूटपाथवर 120च्या स्पीडने कार, ड्रग्जच्या नशेत 23 जणांना चिरडलं
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर एका कारने अनेक लोकांना चिरडलं. या अपघातात एलिसा एल्समन नावाच्या 18 वर्षीच मुलीचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत.
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
टाइम्स स्क्वेअरवर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 26 वर्षीय बडतर्फ लष्करी जवान रिचर्ड रोजासने नशेच्या अंमलात भरधाव कार पादचाऱ्यांच्या अंगावर चढवली. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी रिचर्ड रोजास हा ब्रॉन्क्सचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिचर्डने ड्रग्जच्या नशेत आपली कार फूटपाथवर चढवली आणि त्यानंतर कार पोलला जाऊन धडकली. टाइम्स स्क्वेअरवर कायमच वर्दळ असते. अपघाताच्या वेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता.
अपघातानंतर रिचर्डने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस कोठडीत येताच मला या सगळ्यांना मारायचं होतं, असं रिचर्ड रोजास जोरजोरत ओरडू लागला. रिचर्डवर खून आणि 20 जणांच्या हत्येचा प्रयत्नासह अनेक आरोपांखाली खटला चालवण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, त्याच्या या कृत्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमागे अतिरेकी हात असल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, असं शहराचे महापौर बिल डे बलसियो यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
Times Square car crash driver Richard Rojas 'heard voices' https://t.co/V9t5dsDFtO Graphic CCTV footage of the car driving in to pedestrians pic.twitter.com/48uxE4w9Zi
— Vostvitzech (@Vostvitzech) May 19, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement