IHU Variant in France : मागील दोन वर्षापासून अधिक काळ जगभरात कोरोना महामारीने (Corona) हाहाकार माजवला आहे. त्यात कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतला आणि पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. या व्हेरियंटचा सामना जगभरात होत असतानाच आता फ्रान्समध्ये एका नव्या व्हेरियंटचा जन्म झाला आहे. या नव्या व्हेरिएंटला संशोधकांनी ‘आयएचयू’ (IHU Variant) असं नाव दिलं आहे.


विशेष म्हणजे हा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक ताकदवर असून या व्हेरियंटचे तब्बल 46 म्युटेंशन्स झाले आहेत. याचा अर्थ हा विषाणू ओमायक्रॉनपेक्षा बऱ्याच पटीने अधिक शक्तीशाली आहे. हा विषाणू फ्रान्सच्या IHU Mediterranee Infection या वैद्यकीय संस्थेतील संशोधकांनी शोधला आहे. ज्यानंतर त्याला IHU Variant असं नाव देण्यात आलं आहे.


आतापर्यंत या नव्या व्हेरियंटचे किमान 12 रुग्ण फ्रान्समध्ये आढळले आहेत. दरम्यान हे सारे कॅमेरुन या देशांतून प्रवास करुन आले असल्याची माहितीही समोर येत आहे. एकीकडे जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढून तिसऱ्या लाटेची चिंता वाढत आहे. त्यातच आता हा नवा व्हेरियंट आल्याने जगाची चिंता आणखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली असून अधिक काळजी घेणं गरजेचं झालं आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या: