Corona In India : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध राज्यात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 11 हजार 7 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 1 लाख 71 हजार 830 झाली आहे. तर आत्तापर्यंत देशात 3 कोटी 49 लाख 60 हजार 261 झाली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 4 लाख 82 हजार 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात 3 कोटी 43 लाख 6 हजार 414 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. तर देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 146 कोटी कोरोनाचे डोस दिले आहेत. दरम्यान देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. देशात आत्तापर्यंत 1 हजार 892 जणांना ओमायक्रॉनचे लागण झाली आहे. तर यामधून 766 लोक बरे झाले आहेत.





काल देशात कोरोनाचे 33 हजार 750 नवे रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली होती. तर 123 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी राज्यात तब्बल  12 हजार 160 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 748 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या वाढतच आहे. रुगणसंख्येने  बारा हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  काल राज्यात   68  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 578 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत 4 हजार 99 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. साडेसात महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण काल आढळले आहेत. गेल्या वर्षी 18 मे ला 4 हजार 482 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. सध्या दिल्लीत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 10 हजार 986 आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: