COVID 19 Cases In Delhi : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच दिल्लीमध्येसुद्धा रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमीलीचे आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 5 हजार 500 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्ण वाढण्याचा दर हा 8.37 टक्के झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिल्लीत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे दिल्लीतच आहेत.


जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगानं वाढणारे कोरोनाचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्हिटी रेट वेगानं वाढत आहे. 


याबाबत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बस स्टॉप आणि मेट्रो स्टेशनवर सर्वाधीक कोरोनाचे संक्रमण होण्याची भिती सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे. सर्वांना मास्क वापरने बंधनकारक केले आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध राज्यात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 11 हजार 7 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: