Nepal Missing Plane Found : नेपाळमधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील 21 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे. नेपाळ एअरलाईन्सकडून मृत प्रवाशांची नावे जाहीर केली आहेत.


रविवारी चार भारतीयांसह 22 जणांसह विमान बेपत्ता झालं होतं. नेपाळमधील मुस्तांग भागात हा विमान अपघात झाला. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल नारायण सिलवाल यांनी विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला आहे. 






बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध होता. मात्र काल बर्फवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. खराब हवामानात नेपाळच्या सेनेचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज असलेल्या भागात पोहोचलं. बर्फवृष्टी थांबल्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं. पायलटच्या फोनंच शेवटचं लोकेशन ट्रॅक करत विमान शोधण्यात यश आलं आहे.


या विमानात चार भारतीय नागरिकांसह एकूण 22 जण होते. नेपाळच्या 'तारा एअर'च्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने पोखरा येथून सकाळी 09.55 वाजता उड्डाण केलं. विमान कंपनीच्या प्रवक्त्यानं माहिती दिली की, उड्डाणानंतर 15 मिनिटांनी विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यानंर विमान बेपत्ता झालं. त्यानंतर संपर्क तुटलेल्या भागात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले. नेपाळमधील मुस्तांग या ठिकाणी बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले होते. त्यानंतर आता थासांग-2 येथील सनोसवेअर दुर्घटनाग्रस्त विमान सापडलं आहे.


मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी


या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असं या चार भारतीय प्रवाशांची नावं आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या