Nepal Plane Crash : नेपाळमध्ये बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. पायलटचा फोन ट्रॅक करत विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तारा एअरलाईनचं विमान रविवारी सकाळी विमान बेपत्ता झालं. यानंतर बेपत्ता विमानाचा शोध सुरु झाला. मात्र नंतर बर्फवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. खराब हवामानात नेपाळच्या सेनेचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज असलेल्या भागात पोहोचलं. आता बर्फवृष्टी थांबल्यानंतर पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. पायलटच्या फोनंच शेवटचं लोकेशन ट्रॅक करत विमान शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या विमानात चार भारतीय नागरिकांसह एकूण 22 जण होते. नेपाळच्या 'तारा एअर'च्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने पोखरा येथून सकाळी 09.55 वाजता उड्डाण केलं. विमान कंपनीच्या प्रवक्त्यानं माहिती दिली की, उड्डाणानंतर 15 मिनिटांनी विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यानंर विमान बेपत्ता झालं. त्यानंतर संपर्क तुटलेल्या भागात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याची माहितीही समोर आली आहे. नेपाळमधील मुस्टांग या ठिकाणी या विमानाचे अवशेष सापडले असून बचाव पथक त्या ठिकाणी पोहचलं आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू
विमान कोसळल्याच्या शक्यतेने मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी विमाने पाठवली आहेत. त्याशिवाय नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टरदेखील शोधासाठी पाठवण्यात आलं आहे. विमान अपघाताच्या ठिकाणी बर्फवृष्टीमुळे शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आलं. रविवारी सकाळी झालेल्या बर्फवृष्टीमुळे बंद पडल्यानंतर शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे नेपाळी लष्कराने सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या