एक्स्प्लोर
रशियावर आता ‘नाटो’ची कारवाई, सात डिप्लोमॅट्सची हकालपट्टी
ट्रम्प सरकारने अमेरिकेतून 60 रशियन अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून गच्छंती केल्यानंतर, आता नाटोनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. नाटोने (नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गनाइजेशन) रशियाच्या सात डिप्लेमॅट्सची हकालपट्टी केली आहे.

ब्रसेल्स : ट्रम्प सरकारने अमेरिकेतून 60 रशियन अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून गच्छंती केल्यानंतर, आता नाटोनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. नाटोने (नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गनाइजेशन) रशियाच्या सात डिप्लेमॅट्सची हकालपट्टी केली आहे. समाचार एजन्सी 'एफे'च्या रिपोर्टनुसार, ब्रसेल्समधील एका पत्रकार परिषदेत नाटोचे महासचिव जेंस स्टोलनबर्ग यांनी सांगितलं की, ‘नाटो’च्या 25 सहकारी आणि भागिदारांच्या प्रतिक्रियेनंतर रशियन डिप्लोमॅट्सची हकालपट्टी करण्यात आली. नॉर्वेच्या राजकीय विश्लेषकाने सांगितलं की, नाटोकडून पुढील कारवाईसाठी सर्वजण एकत्रित आहेत. नाटोच्या रशियन मिशनअंतर्गत कार्यरत सात डिप्लोमॅट्सची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यातील तीन जणांचं स्थायी सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? रशियाचे माजी राजदूत स्क्रीपल आणि त्यांची मुलगी यूलिया यांच्यावर 4 मार्च रोजी सालिसब्यूरीमध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. या दोघांची प्रकृती चितांजनक असून, त्यांच्यवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नोविचोक नावाचे हे विष असल्याचे ब्रिटेनच्या अधिकऱ्यांनी स्पष्ट केलं. नोविचोक हे एक 'नर्व एजेंट' असून, शीत युद्धाच्या काळात त्याचा वापर करण्यात आला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर अमेरिकेने यूरोपियन देशांसह 60 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. तर ब्रिटेनने एकूण 23 रशियन अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अमेरिकेने ज्या 60 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, त्यातील अनेकजण संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. दरम्यान, अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे अशीही चर्चा आता रंगली आहे. अमेरिकेच्या कारवाईनंतर एस्तोनिया, लटाविया, कोएशिया, फिनलँड, हंगेरी, स्वीडन आणि रोमानियाने आपल्या देशातील रशियन राजदूतांची हकालपट्टी केली आहे. तर रशियामध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवणार नसल्याची घोषणा आइसलँडने केली आहे. त्याशिवाय, इतर अनेक देशांनीही आपापल्या देशातून रशियन राजदूतांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. संबंधित बातम्या हेरगिरीच्या आरोपावरुन 60 रशियन अधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र























