एक्स्प्लोर

दहशतवादाविरोधात भारताला मोठं यश, हाफिज सईदला पाकिस्तानात बेड्या

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानातील लाहोरमधून अटक झाली आहे. हाफिज सईद 2008 मधील 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. लाहोरमधून अटक झालेल्या सईदला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

इस्लामाबाद : दहशतवादाविरोधात भारताचा दबावाला मोठं यश आलं आहे. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. हाफिज सईदची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. लाहोरहून गुजरनवाला इथे जाताना हाफिज सईदला अटक करण्यात आली. पाकिस्तानात दहशतवादाविरोधात काम करणारी सरकारी संस्था काऊंटर टेरोरिझम डिपार्टमेंट अर्थात सीटीडीने हाफिज सईदला लाहोरमध्ये बेड्या ठोकल्या. सीटीडीने 3 जुलै रोजी हाफिज सईदसह जमात उद दावाच्या 13 नेत्यांविरोधात 23 गुन्ह्यांची नोंद केली होती. पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादासाठी आर्थिक सहाय्य   पुरवल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या कारवाईवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण पाकिस्तानने याआधीही हाफिज सईदवर कारवाई केल्याचं नाटक केलं आहे. पण त्याच्याविरोधात ठोस पाऊलं उचललेली नाहीत. दुसरीकडे, ऑक्टोबरपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा गर्भित इशारा फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात FATF ने दिला होता. त्यामुळे पाकिस्तानातील डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारने हाफिज सईदवर कारवाई केल्याची चर्चा आहे. ब्लॅक लिस्टपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचा डाव आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला पाकिस्तान कोणत्याही प्रकारची बंदी झेलण्याच्या परिस्थिती नाही. त्यामुळे स्वत:च पोसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाईचा दिखावा करण्याशिवाय पाकिस्ताकडे पर्याय नाही. संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. तर अमेरिकेनेही त्याच्यावर भलीमोठी रक्कम जाहीर केलं आहे. हा पाकिस्तानचा दिखावा : उज्ज्वल निकम मुंबई हल्ल्याच्या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही पाकिस्तानची कारवाई फक्त दिखावा असल्याचं सांगितलं आहे. आम्ही मुंबई हल्ल्यासंदर्भातील पुरावे पाकिस्तानला सोपवले होते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबावामुळे जगाला धोका देत आहे. आता पाकिस्तान हाफिज सईदविरोधात किती पुरावे सादर करतं आणि त्याला किती शिक्षा ते, हे पाहावं लागेल. नाहीतर मी याला फक्त एक ड्रामाच म्हणेन, असं उज्ज्वल निकम म्हणाले. कोण आहे हाफिज सईद? - हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. तसंच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह-संस्थापकही आहे. - भारतातील अनेक दहशतवाई हल्ले या दोन संघटनांनी केले आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. - अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. - अमेरिकेने हाफिज सईदवर एक कोटी डॉलरचं इनामही जाहीर केलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget