एक्स्प्लोर
व्हॅटिकन सिटीत मदर तेरेसा यांना संतपद बहाल!
व्हॅटिकन सिटी(रोम): संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल करण्यात येणार आहे. रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात पोप फ्रान्सिस मदर तेरेसा यांना संतपद बहाल करणार आहेत.
दुपारी अडीचच्या दरम्यान हा सोहळा होईल. व्हॅटिकन सिटीमधल्या सोहळ्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. जगभरातील एक लाखांपेक्षा जास्त अनुयायी या कार्यक्रमाला हजर असणार आहेत.
मदर तेरेसा यांना संतपद बहाल करणार असल्याचं वृत्त समजल्यापासून भारतातही उत्सवाचं वातावरण आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या वतीने 12 सदस्यीय मंडळ या सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement